Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रंगला टाइमपास २ चा संगीत ध्वनीप्रकाशन सोहळा

Date:

13 14 11 12 16 17 18 20 22 23

‘मला वेड लागले प्रेमाचे’ म्हणत गेल्या वर्षी समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला चित्रपट म्हणजे ‘टाइमपास’. कुमारवयात मनात फुलणा-या प्रेमाच्या भावना त्यावर आधारीत सुंदर कथा, जबरदस्त संवादांनी भरलेली पटकथा, कलाकारांचा तगडा अभिनय आणि सोबतीला तेवढंच सुमधूर संगीत. या सर्वांच्या आधारावर ‘टाइमपास’ या चित्रपटाने इतिहास रचला. यात प्रथमेश परबने साकारलेल्या दगडूला आणि केतकी माटेगावकरने साकारलेल्या प्राजक्ताला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या दोघांच्या लवस्टोरीने सर्वांची मने जिंकली. टाइमपास या चित्रपटाच्या शेवटी दगडू आणि प्राजक्ताची लवस्टोरी पूर्ण झाली नव्हती पण चित्रपट संपताना पडद्यावर to be continued… अशी अक्षरे झळकली तेव्हाच या चित्रपटाचा दुसरा भाग (सिक्वल) येणार हा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आणि तेव्हापासून टाइमपास २ ची उत्कंठा सुरू झाली. या नव्या चित्रपटात दगडू -प्राजक्ता कोण असणार याचे आढाखे बांधले जाऊ लागले, शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या. प्रेक्षकांनी तर आपापले पर्याय निर्मात्यांना सुचवायला सुरूवातही केली आणि प्रेक्षकांच्या या आतूरतेने निर्मात्यांना तात्काळ ‘टाइमपास २’ आणायला भाग पाडले. अनेक सुमधुर आणि धम्माल गीतांनी सजलेल्या या ‘टाइमपास २’ चित्रपटाच्या ध्वनीप्रकाशनाचा सोहळा बॉलिवुडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना सचिनजी म्हणाले की, “रवी जाधव हा कमालीचा हुशार दिग्दर्शक आहे हे त्याने आजवरच्या त्याच्या सर्वच चित्रपटांमधून सिद्ध केलंय. ‘टाइमपास’ या चित्रपटाने यशाचे सर्व विक्रम मोडत जो इतिहास घडवला तसंच यश ‘टाइमपास २’ ला ही मिळो.” या चित्रपटाला शुभेच्छा देताना रितेश म्हणाला की, “या चित्रपटाचं ट्रेलर बघितल्यापासूनच तो पूर्ण चित्रपट मला कधी बघायला मिळेल याची उत्सुकता लागलीये. हा टीपी २ सर्व प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल आणि भरघोस यश मिळवेल याची मला खात्री आहे.” या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधव, संगीतकार चिनार – महेश, गीतकार मंगेश कांगणे, चित्रपटाची निर्मिती करणा-या अथांश कम्युनिकेशन्सच्या मेघना जाधव, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी, बिझनेस हेड निखिल साने, व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइमपासच्या या सिक्वलमध्ये दगडू आता झालाय रॉकी आणि या रॉकीची भूमिका साकारतोय हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव तर प्राजक्ता साकारतेय गुणी अभिनेत्री प्रिया बापट. मोठा झालेला दगडू म्हणजेच रॉकी चाळ सोडून गेलेल्या प्राजक्ताच्या शोधात निघालाय हे या ‘टाइमपास २’ चं कथानक. ‘टाइमपास’ प्रमाणेच ‘टाइमपास २’ चं वैशिष्ट्य ठरणार ते यातील धम्माल आणि रोमॅंटिक गाणी. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गाण्यांना संगीत दिलंय चिनार-महेश यांनी. ‘टाइमपास २’ या चित्रपटात एकूण ७ गाणी असून त्यात रोमॅंटिक, धम्माल डान्स नंबर, विरहगीत  अशी विविध मूड्सची गाणी आहेत. यातील सध्या सर्वत्र गाजत असलेलं गाणं म्हणजे बॉलिवूडमधला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने गायलेलं ‘वॅऊ वॅऊ’ हे गाणं. अॅम्ब्युलंसच्या सायरनवर धरलेला ठेका आणि सर्वांना ठेका धरायला लावणारं संगीत यामुळे हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालं आहे. याव्यतिरिक्त यात ‘प्राजू’ हे गीत गायलंय महालक्ष्मी अय्यर आणि ऋषिकेश कामेरकर याने तर ‘मदन पिचकारी’ हे गाणं अपेक्षा दांडेकर आणि प्रसिद्ध बॉलिवुड रॅपर इश्क बेक्टरने गायलंय. गायलंय. ‘तू मिला’ हे रोमॅंटिक गाणं शाल्मली खोलगडे आणि निखिल डिसुझा यांनी गायलं असून क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं ‘दगडू सावधान’ हे भन्नाट गीत गायलंय ऋषिकेश कामेरकर, चिनार खारकर, विवेक नाईक यांनी. याशिवाय प्रेमातील हळवेपणा व्यक्त करणारं ‘सुन्या सुन्या’ हे गीत आदर्श शिंदे आणि केतकी माटेगावकर यांनी स्वरबद्ध केलंय. ‘टाइमपास’ मधील ‘ही पोली साजूक तुपातली’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. याच गाण्याचा ठेका धरत ‘ही पोली साजुक लेलेची रं हिला परबाचा लागलाय नाद’ हे धम्माल टाइमपास गाणं गायलंय आनंद शिंदे यांनी.

‘टाइमपास’च्या जबरदस्त यशानंतर तीच टीम ‘टाइमपास २’ घेऊन येतेय. एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या ‘टाइमपास २’ चं दिग्दर्शन केलंय रवी जाधव यांनी. चित्रपटाची कथा रवी जाधव यांचीच असून त्यांनी प्रियदर्शन जाधव, क्षितिज पटवर्धन यांच्या सोबतीने पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. चित्रपटाचं छायालेखन वासुदेव राणे यांनी तर नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलंय. चित्रपटात प्रियदर्शन आणि प्रियासह वैभव मांगले आणि भाऊ कदम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ या चित्रपटाच्या यशानंतर एस्सेल व्हिजनचा हा नवा चित्रपट येत्या १ मे ला म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...