ईस्लामाबाद – म्यानमार कारवाई नंतर भारत आणि पाक मध्ये जोरदार शाब्दिक युध्द सुरु झाल्याचे दिसते आहे आम्ही म्हणजे म्यानमार नाही … अणुबॉम्ब काय शब-ए-बारात साठी राखून ठेवला आहे का?अशा शब्दात पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी भारताच्या म्यानमार कारवाईवर रग्गेल विधान केल्याच्या बातम्या येत आहेत
म्यानमारमधील कारवाईनंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी या मुद्यावरून पाकिस्तानच्या लष्कराला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण अणुबॉम्ब काय शब-ए-बारात साठी राखून ठेवला आहे का? असा सवाल मुशर्रफ यांनी लष्कराला केला आहे.वेळप्रसंगी म्यानमारप्रमाणेच शेजारी देशांच्या सीमेतही प्रवेश करून ऑपरेशन करू या इशाऱ्यावर पाकिस्तानने पलटवार केला आहे. आम्ही म्यानमार नसून अण्वस्त्रधारी देश आहोत, त्यामुळे सीमोल्लंघन केल्यास त्याचे उत्तर दिले जाईल, असे पाकिस्ताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित मंत्री राणा तनवीर हुसेन यांनी भारताला इशारा देत असे म्हटले आहे की, ”आम्ही म्यानमार नाही, तुम्हाला आमच्या शक्तीचा अंदाज नाही का? पाकिस्तान एक न्युक्लिअर नेशन आहे. आमच्याकडे न्युक्लिअर बॉम्ब आहे. म्यानमारप्रमाणे शेजारी देशांत दहशतवाद्यांविरोधी कारवाईसाठी भारत सीमेपलिकडेही जाऊ शकतो, असे संकेत भारताने बुधवारी दिले होते.
भारताच्या लष्काराने म्यानमारमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईतून दहशतवाद्यांना बंदोबस्त करण्याबाबत भारताचा बदललेला दृष्टीकोन दिसत असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर गुरुवारी म्हणाले. पर्रिकर म्हणाले की, बदल घडण्यासाठी दृष्टीकोन बदलण्याची गरज असते. दहशतवाद्यांच्या विरोधात घेतलेल्या एका साधारण अॅक्शमुले देशात सुरक्षेच्या संदर्भात दृष्टीकोन बदलला आहे. तसेच जे भारताच्या या बदललेल्या दृष्टीकोनामुले घाबरले आहेत