हिंद तरुण मंडळाच्यावतीने पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक व मंडळाचे पंचवार्षिक अध्यक्ष दिलीप गिरमकर यांच्या वाढदिवसानिमित सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने पुणे कॅंटोन्मेंट भागातील नागरिकासाठी ” मोफत हृदयरोग निदान व उपचार शिबीर , गुडघे सांधे खुबे मोफत तपासणी , मेंदू विकार निदान शिबीर संपन्न झाले
पुणे कॅम्प भागातील जान मोहम्मद स्ट्रीटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या आरोग्य शिबिरामध्ये २६७ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी केली . यामध्ये ३६ रुग्णाची अनजोप्लास्टी , २४ रुग्णाची बायपास ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे , या सर्व शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत करण्यात येणार आहे . अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक घोणे यांनी दिली .
या शिबिरासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे हृदय रोग सर्जन डॉ महेंद्र बाफना , डॉ. स्वाती निकम , डॉ. अंजली काळे , अनुज बाबू , मेघना काळे , शरद काथवटे , मंगेश पाटील , दीपक कालीगंडा , टेक्नीशियन हिमानी पवार , अश्विनी फडणीस आदींनी विशेष परिश्रम घेतले . हिंद तरुण मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .


