पुणे:-कलकत्ता येथील वर्ल्ड योग फौंडेशन च्या वतीने देण्यात येणारा योग शिरोमणी व मानव सेवा रत्न पुरस्कार या वर्षी धार्मिक उलेखनीय कार्या बद्दल गुरु मॉ धर्मदीक्षा यांना पुण्यात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री आर के पांडे यांनी मॉ धर्मदीक्षा आविष्कृत संवेदन शास्त्रा बद्दल विवेचन केले योगाच्या माध्यमाला अनुसरून विशिष्ठ पद्धतीने समाजात शारीरिक मानसिक व आत्मिक संतुलन आणण्यासाठी संवेदन शास्त्राची उपयोगिता असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षांच्या भाषणात हा पुरस्कार मॉ धर्मदीक्षा यांनी संवेदन शास्त्र द्वारे शोध वर्तनाचा आणलेल्या मुद्रा उपचार व योग विज्ञान द्वारे शरीर अंतर्गत गुप्त दयानंविषयी मानव जीवन उपयुक्त पुस्तकाचे अवतरण दिलेले सांगितले.
मॉ धर्मदीक्षा यांनी मानवाचे संपूर्ण स्वस्थ जे शारीरिक मानसिक तसेच आत्मिक धरणावर अवलंबून त्या करिता योग मार्ग त्यातील प्रक्रिया व संवेदन शास्त्राची जोड या अवतरणाच शक्य आहे असे सांगितले.
ट्रस्टचे कार्यवाहक व ट्रस्टी श्री दिनेश फेरवानी,संतोष तांदळे व विजयपाल सिह यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.

