मुंबईचे तीन तेरा वाजवून राज्यभर पावसाची दमदार सुरुवात- पर्यटक आनंदी …

Date:

पुणे-मुंबईचे सलग तीन दिवस तीनतेरा वाजविल्यानंतर पावसाने राज्यभर दमदार पणे आपले आगमन नोंदविले आहे
कोकण आणि विदर्भावर पावसाने जोरदार वृष्टी केली आहे आहे. शनिवारी व रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.त्यानंतर सोमवारी हि सकाळी तो बरसतच होता राज्यातील अनेक गावांमध्ये एका महिन्यात पडणारा पाऊस गेल्या २४ तासांत रत्नागिरी आणि चंद्रपुरात बरसला, तर रत्नागिरीतील संगमेश्वर येथे राज्यातील सर्वाधिक २३० तर चंद्रपूर येथे २०० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. गेल्या आठवड्यापासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत पुणे शहरालाही  रविवारी आणि पुन्हा सोमवारी सकाळी देखील पावसाने सुखद धक्का दिला
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याला रविवारीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीतील शिरगाव येथे रविवारी घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. सर्वत्र पाऊस झाल्याने बस व रेल्वे वाहतूक विस्कळित झाली.

पुण्यात यंदाच्या पावसाळी हंगामात प्रथमच शहरभर पडलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांवर साचलेले पाणी आणि मध्यवर्ती भागातील काही मुख्य चौकातील बंद पडलेले सिग्नल यामुळे रविवारी वाहतुकीचा बोजवारा उडाला.
रविवारी मान्सूनने उत्तरेकडे आणखी मजल मारली. छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात तसेच झारखंडच्या काही भागात मान्सून दाखल झाला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात ते केरळपर्यंतच्या किनारपट्टीवरील द्रोणीय स्थिती यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. पुढचे दोन-तीन दिवस या हवामानात बदल होणार नसल्याने पावसाचा जोर टिकून राहील, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणातील अनेक गावांना शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपले. काही गावांमध्ये तर पावसाने दोनशे मिलिमीटरचा आकडा ओलांडला. विदर्भातही सर्वदूर सरासरी पन्नास मिलिमीटर पाऊस झाला. तुलनेने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता.
मुंबईत सलग तिसर्‍या दिवशी रविवारी संततधार कायम हाेती. शनिवारी रात्री वांद्र्यातील फूल गल्लीत इमारतीचे बांधकाम चालू असताना पावसामुळे काही भाग खचून झालेल्या दुर्घटनेत यास्मीन इम्रान शेख (२७) आणि सरीना इम्रान शेख (१३) य मायलेकींचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पुरात एक वाहून गेला तर दरड काेसळून महिलेचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात वीज पडून दाेघे ठार झाले. दुसरीकडे चंद्रपूरमध्ये खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून इंिजनिअर मेकॅनिकल एस. एम. ढोबळे यांचा मृत्यू झाला.
महाबळेश्वर मध्ये  गेल्या दाेन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये नियमित सुरू असलेल्या पावसाचा शनिवारपासून चांगलाच जाेर वाढला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तब्बल १८४ मिलिमीटर म्हणजेच ७.५ इंच पावसाची नाेंद झाली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५३.४ मिमी (६.१ इंच) पाऊस बरसला. म्हणजेच ३३ तासांमध्ये १३.५ इंच पाऊस बरसला.
दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने पंचगंगेचे पात्र दुथडी भरून वाहू लागले. तसेच जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या दाेन दिवसांत ७१८ मिमी , तर एक जून पासून २१३२ मिमी पावसाची नाेंद झाली. करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज आणि शिरोळ येथे मध्यम पाऊस असला तरी उर्वरित आठ तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या...

एमआयडीसीच्या नव्या परिपत्रकानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण; उद्योगांना मोठा दिलासा

नव्या धोरणांचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा- प्रादेशिक अधिकारी हनुमंत...

अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शन महा पशुधन एक्स्पो, २०२६अधिकृत लोगोचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

पुणे, दि ११ फेब्रुवारी २०२६ः महाराष्ट्र शासनाच्या पशुसवर्धन विभागाच्या...

विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 पुण्यात 15 फेब्रुवारीला

पुणे: भारताच्या राइडिंग समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 चे उद्घाटन 15 फेब्रुवारी 2026 रोजी हॉटेल हयात पुणे येथे होणार आहे. भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक व्यासपीठ विंगमॅनएक्स, मोटरसायकलस्वारांसाठी समर्पित या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचे आयोजन करत आहे. हा कार्यक्रम केवळ आमंत्रित व्यक्तींसाठीच विशेष प्रवेश आहे. राइडर-नेतृत्वाखालील सन्मानासाठी राष्ट्रीय मापदंड ठरणाऱ्या या पुरस्कारांचा उद्देश भारतीय मोटरसायकलिंगची खरी ओळख ठरवणाऱ्या चिकाटी, शिस्त, जबाबदारी आणि समुदायभावना यांचा गौरव करणे हा आहे. भारतात प्रथमच राइडिंग परिसंस्थेला मुल्यवर्धित करणाऱ्या गुणांसाठी राइडर्स आणि राइडिंग समुदायांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जाणार आहे. एका राइडरच्या गरजेतून उगम पावलेले आणि वाढत्या समुदायाने घडवलेले विंगमॅनएक्स अवॉर्ड्स, देशभरातील मोटरसायकलिंग संस्कृतीला शांतपणे बळकट करणाऱ्या व्यक्ती आणि क्लब्सचा सन्मान करतात. या पुरस्कारांमध्ये एकूण 20 निवडक श्रेणी आहेत, ज्यात वैयक्तिक उत्कृष्टता आणि सामूहिक समुदाय प्रभाव या दोन्हींचा समावेश आहे. सुरक्षित राइडिंगचे नेतृत्व, लांब पल्ल्याचे राइडिंग, महिला राइडर्स आणि समुदाय-नेतृत्वाखालील उत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या श्रेणी यात समाविष्ट असतील. यामध्ये गार्डियन राइडर अवॉर्ड, लाँग हॉल लेजेंड्स, शी राईड्स फ्री, क्लब ऑफ द इयर, सेफ्टी-फर्स्ट क्लब अशा श्रेणींचा समावेश आहे. या उपक्रमामागील दृष्टीकोन स्पष्ट करताना निलेश साने, सीईओ आणि संस्थापक, विंगमॅनएक्स म्हणाले, “विंगमॅनएक्सची सुरुवात राइडर्सना योग्य राइडिंग साथीदार शोधण्यात मदत करण्याच्या साध्या कल्पनेतून झाली. कालांतराने ते विश्वास, जबाबदारी आणि समुदायभावनेवर उभे असलेले एक व्यापक परिसंस्था बनले. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स हे अशा राइडर्सचा सन्मान करण्याचे आमचे माध्यम आहे, जे रोज या मूल्यांनुसार जगतात आणि कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा ना करता, भारताची मोटरसायकलिंग संस्कृती घडवतात.” याच भावनेला दुजोरा देताना उर्वशी पाटोले, पार्टनर – कम्युनिटी आणि मार्केटिंग म्हणाल्या, “राइडिंग विश्वात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या सातत्य, शिस्त आणि उत्कटतेचा हा सन्मान आहे. मोटरसायकलिंग संस्कृती सतत विकसित होत असते आणि विंगमॅनएक्स अवॉर्ड्स दरवर्षी वाढत जाण्यासाठी सुरू केले गेले आहेत. हे पुरस्कार राइडर्सना केवळ त्यांनी किती अंतर प्रवास केला यासाठी नव्हे, तर त्यांनी समुदायाला कसे उंचावले यासाठी सन्मानित करतात.” डॉ. साहिल त्रिंबके, सह-संस्थापक, विंगमॅनएक्स यांनी पुढे सांगितले, “मोटरसायकलिंग म्हणजे केवळ राइडिंग कौशल्य नाही; ते निर्णयक्षमता, जबाबदारी आणि रस्त्यावर एकमेकांची काळजी घेण्याची भावना आहे. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स अशा राइडर्स आणि समुदायांचा सन्मान करतात, जे आपल्या कृतीतून ही मूल्ये स्थापित करतात, केवळ कामगिरीतून नव्हे. या मूल्यांचा सार्वजनिक गौरव करून आम्ही देशभरात अधिक सुरक्षित आणि जबाबदार राइडिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा ठेवतो.” या पुरस्कारांच्या केंद्रस्थानी आहे विंगमॅनएक्स अॅप – राइडर्सनी राइडर्ससाठी तयार केलेले भारतातील अग्रगण्य कम्युनिटी-टेक व्यासपीठ. भारतातील विखुरलेल्या राइडिंग विश्वाला एक सुसंगत डिजिटल आधार देणारे हे अॅप राइड ट्रॅकिंग, क्लब मॅनेजमेंट, सुरक्षा वैशिष्ट्ये, सत्यापित राइडर प्रोफाइल्स आणि समुदाय शोध अशा सुविधा पुरवते. अलीकडेच यात राइडर बॅजेस, राइडदरम्यान लाईव्ह ग्रुप लोकेशन ट्रॅकिंग आणि पीअर-आधारित राइडर रेटिंग्स ही नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे जबाबदारीची भावना अधिक बळकट होते. 80,000 हून अधिक अॅप डाउनलोड्स आणि 500 पेक्षा जास्त राइडिंग क्लब्स आधीच सक्रिय असलेल्या विंगमॅनएक्स प्लॅटफॉर्मवर, भारतीय मोटरसायकलस्वार कसे जोडले जातात, कसे राइड करतात आणि एकत्र कसे प्रगती करतात याची व्याख्या सतत नव्याने केली जात आहे. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 हे वार्षिक उपक्रम म्हणून संकल्पित असून, येत्या काळात भारतीय मोटरसायकलस्वारांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी सन्मान मंच ठरण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. विंगमॅनएक्स विषयी: विंगमॅनएक्स हे भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक परिसंस्था आहे, जे तंत्रज्ञान, समुदाय आणि सामायिक अनुभवांच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, जबाबदार आणि परस्पर जोडलेली राइडिंग संस्कृती घडवण्यावर लक्ष केंद्रित करते. हे ॲप गूगल प्ले आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.