पुणे : मुंढवा येथील घरगुती वीजग्राहकाने महावितरणची अधिकृत वीजजोडणी नसताना चोरीच्या विजेचा वापर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यात 6411 युनिटस्ची म्हणजे 71 हजार 340 रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 20) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, बंडगार्डन विभाग अंतर्गत मुंढवामधील सुतारवाडा येथील रामचंद्ग तुकाराम सुतार यांच्या घरात महावितरणची अधिकृत वीजजोडणी नाही. तथापि, त्यांच्या घरात जवळच असलेल्या लघुदाबाच्या खांबावरून केबलद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु असल्याचे दिसून आले. यात एकूण 6411 युनिटस्च्या म्हणजे 71,340 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
याप्रकरणी पंचनामा करून रामचंद्ग तुकाराम सुतार विरुद्ध रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये शुक्रवारी (दि. 20) गुन्हा दाखल करण्यात आला.