पुणे- बालेवाडी नजीक अभियंत्याचे शिक्षण घेणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय तरुणाची ‘बहाद्दुरी ‘ पहा , त्याने मिस कॉल देवून एका महिलेशी ओळख करवून घेतली .. ओळखीने घरोबा निर्माण केला आणि चक्क घरातून लॉकरची चावी चोरून २० तोळे सोने पळविले . याला तर अखेर पोलिसांनी पकडले दरम्यान आणखी एक चोरटा हाती लागला असून याप्रकरणातून चतुर्श्रुंगी पोलिसांना ३ घरफोड्यांचा तपास उलगडला आहे .
नागेश पांडुरंग शिंदे उर्फ अनिकेत जाधव (वय १९ रा. बालेवाडी, मुळगाव -उदगीर, लातूर ) आणि इरफान उर्फ इप्पू अश्रफ खान (वय ३२ रा. घोरपडी ) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . पोलिसांनी असेही सांगितले कि , नागेश शिंदे याने एका महिलेला मिसकॉल देवून तिच्याशी ओळख वाढविली आणि नंतर घरोब्याचे संबध निर्माण केले त्या महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर लॉकरची चावी लंपास करून लॉकर मधील सोन्याचे दागिने पळविले . या प्रकरणी १८ ऑक्टोबर २०१५ रोजी पोलिसात गुन्हा नोंदविला गेला . याचा तपास सुरु असताना पोलीस नाईक संजय वाघ यांना मिळालेल्या माहितीवरून एसीपी वैशाली जाधव; पी आय अरुण सरावंत, उदय शिंगाडे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाराम धरमसिंग चव्हाण ,तसेच श्री पाचपुते , पोलीस कर्मचारी गिरी , पाटील यांनी सापळा रचून बालेवाडी येथील लक्ष्मी मंदिराजवळ नागेश शिंदे ला पकडले . त्याच्या घरातून १४ तोळे सोने हस्तगत केले आणि त्याने उदगीर येथे ६ तोळे ज्यास विकले त्या सराफाचा शोध सुरु केला . दरम्यान इप्पू उर्फ इरफान हा दुसरा चोरटा अशोकनगर कस्तूरकुंज सोसायटी येथे असल्याची खबर पीएसआय राजाराम चव्हान यांना मिळाली त्यांनी आपले वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी बोत्रे , बाळू गायकवाड संजय शिंदे , अजय गायकवाड, चेतन मोरे यांच्या मदतीने सापळा रचून त्यास पकडले.त्याने २० जून २०१४ रोजी दिलीप मोरेश्वर चांदगुडे , रा. पार्वती बंगला , शिवाजीनगर येथे घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले . त्याच्याकडून ६० हजार रुपयेकिमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून आणखी घरफोड्याचा तपास यामुळे लागेल असा पोलिसांचा दावा आहे