पुणे, दि. 02 : महावितरणमध्ये 1648 विविध पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून अत्यंत
पारदर्शीपणे होत आहे. यात निवडीचे प्रलोभने दाखविण्यात येत असल्यास उमेदवारांनी त्यास बळी पडू नये, असे आवाहन
महावितरणने केले आहे.
दरम्यान, नागपूर येथे भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना निवडीचे प्रलोभन दाखविणार्या काही अज्ञात व्यक्तींविरोधात
महावितरणकडून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.


