मुंबई –
महावितरणने रविवारी 18 ऑक्टोबर 2015 रोजी कमाल मागणीच्या काळात सुमारे 17,311 मेगावॅट विजेचा
पुरवठा करुन नवा विक्रम नोंदविला आहे. यापूर्वी दि. 15 ऑक्टोबर 2015 रोजी 17,259 मेगावॅट एवढी वीज
पुरविण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच महावितरणकडून सातत्याने 16,000 ते 16,500
मेगावॅटपेक्षा जास्त विजेचा पूरवठा केला जात आहे.