Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमेल ‘ढोल ताशे’ चा गजर

Date:

2 3

नेता आणि कार्यकर्ता यांची जुगलबंदी मी आणि जितु जोशी ने रंगविली आहे त्याला संगीताची उत्कृष्ट जोड  ढोल ताशे या चित्रपटात लाभली आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातया ‘ढोल ताशाचा गजर घुमेल असा विश्वास प्रसिध्द अभिनेता अभिजित खांडकेकर याने चाकण येथे व्यक्त केला

 चाकण येथे ‘ढोल ताशे ‘ संगीत सिडी चे थाटात प्रकाशन अभिजित ने केले ब्रम्हांडनायक मूवीज् निर्मित  राजकुमार अंजुटे आणि अतुल तापकीर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारतीय संस्कृतीत तरुणाईच्या मनगटातील बळ आणि सर्जनशीलतेची कसोटी पाहणारा रांगडा कलाप्रकार म्हणून ढोल ताशांकडे पाहिलं जातं. गणेशोत्सवात अभ्यास, ताण-तणाव या सगळ्या किचकट जीवनशैलीतून काही क्षणांचा विरंगुळा म्हणून तरुणाईची पाऊलं ढोल ताशांकडे वळताना दिसतात. ढोल ताशांच्या नादात बेधुंद होणाऱ्या तरूणाईचं चित्रण ‘ढोल ताशे’ या चित्रपटात करण्यात आलं आहे.

भारतीय संस्कृतीत आपलं अढळ स्थान निर्माण केलेल्या ढोल ताशे पथकांकडे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून अद्याप पाहिलं जात नाही. गणेशोत्सवात किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या पथकाचा झेंडा उंचचं उंच फडकता ठेवण्यासाठी हे तरूण अहोरात्र झटताना दिसतात. मात्र अगदी तुटपुंज्या मानधनावर त्यांना समाधान मानावं लागतं. याचं परिस्थितीचं उत्साहवर्धक चित्रण ‘ढोल ताशे’च्या माध्यमातून करण्यात आलं आहे. काही कारणात्सव नोकरीवर गदा आलेला सामान्य घरातला तरूण या ‘ढोल ताशा पथकांचा’ भाग होतो आणि या पथकांची मेहनत पाहून या पथकांना ओळख मिळवून देण्याचा विडा उचलता. आपलं मार्केटिंगचं कसब वापरून ढोल ताशा पथकांना ओळख मिळवून देण्यात तो कितपत यशस्वी होतो, हे पाहण्याजोगं असणार आहे.अभिजित खांडकेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे तर त्याच्या विरूद्ध जितेंद्र जोशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ह्रषिता भट्ट ढोल ताशेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठीत दिसणार आहे. त्याव्यतिरिक्त या चित्रपटात प्रदीप वेलणकर, इला भाटे, विद्याधर जोशी, विनय आपटे आणि इतर कलावंत ही आहेत. या चित्रपटाची गीतं गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत तर निलेश मोहरीर यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटाचं छायाचित्रदिग्दर्शन केदार प्रभाकर गायकवाड यांनी केले आहे. येत्या ३ जुलै ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा – ॲड. अक्षता नेटके

एसबीपीआयएम मध्ये 'निर्भया जनजागृती' सत्र संपन्न पिंपरी, पुणे (दि. ०५...

विमा क्लेमच्या रकमेसाठी वडिलांनी घडवून आणली मुलाची हत्या

खुनासाठी दिली साडेतीन लाखांची सुपारीमुरादाबाद-विमा दाव्याच्या लोभापायी एका वडिलांनी...

4 दिवसांत 1200+ उड्डाणे रद्द, लुट अन हालापेष्टांनी प्रवासी हैराण…

नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनी केवळ व्यक्त केली नाराजी, म्हणाले-...