Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठी चित्रपटांना प्रमोशनचं ‘बिग तिकीट’ ‘झी टॉकीज’चा आगळा प्रयोग

Date:

वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट हे मराठी चित्रपटाचे बलस्थान राहिले आहे. चांगल्या आशयासोबत चित्रपटांचं प्रमोशनही दणक्यात झालं तर प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचतो. सध्याच्या घडीला छोटा पडदा हे प्रसिद्धीचं प्रभावी  माध्यम ठरू लागल्याने छोट्या पडद्यावर चित्रपटांचं प्रमोशन जोरदार होऊ लागलं आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांनी रसिकांची मने जिंकणारं ‘झी टॉकीज मनोरंजनाच्या कक्षा रूंदावणाऱ्या अनेक योजना आखत असते. मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत झी टॉकीजने आगळा प्रयोग केला आहे. आगामी मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा टॉकीज बिग तिकीट’ हा कार्यक्रम नुकताच मुंबईत संपन्न झाला. मनोरंजनाच्या क्षेत्रात हा प्रयोग निश्चितच वेगळा आहे.
टॉकीज बिग तिकीट’ या कार्यक्रमांतर्गत ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’, ‘सैराट’, ‘पिंडदान’, ‘३५% काठावर पास’, ‘लाल इश्क’ या आगामी मराठी चित्रपटांचं प्रमोशन या कार्यक्रमात करण्यात आलं. चित्रपटातील गीतांवर परर्फोमन्स व स्कीट सादर करीत आगामी चित्रपटांची छोटेखानी झलकच यावेळी सादर करण्यात आली.
‘सैराट’च्या आर्ची-परश्याने सादर केलेला नृत्याचा नजराणा चांगलाच रंगला. अजय-अतुल यांनी सैराटच्या गाण्यांबद्दलचे अनुभव यावेळी सांगितले. ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ या चित्रपटातील कलाकरांच्या स्कीटने चांगलीच धमाल उडवली. याच चित्रपटातल्या ऋतुराज फडके व शाश्वती पिंपळकर यांच्या नृत्यानेही चांगलीच बहार आणली. ‘पिंडदान’ या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा व या चित्रपटातल्या  सिद्धार्थ  चांदेकरचा परर्फोमन्सची मेजवानी चाखायला मिळाली. ‘३५% काठावर पास’ चित्रपटातील गाण्यावर प्रथमेश परबने जबरदस्त ठेका धरला. ‘लाल इश्क’ चा धमाकेदार ट्रेलर व वृंदावन चित्रपटातल्या गाण्यांवर राकेश बापटने सादर केलेला नृत्याविष्कार धमाकेदार झाला. या कार्यक्रमाचं खुमासदार सूत्रसंचालन संदीप पाठक व प्रियदर्शन जाधव यांनी केले. ‘फिल्मीबाबा’ झालेल्या पुष्कर क्षोत्रीने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. मनोरंजनाची मेजवानी असणारा टॉकीज बिग तिकीट’ हा कार्यक्रम ८ मे ला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० वा. ‘झी टॉकीजवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. यामध्ये ‘नटसम्राट’, ‘पिंजरा’, ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ या चित्रपटांचा समावेश होता. एकंदरीतच टॉकीज बिग तिकीट’ आगामी मराठी चित्रपटांना प्रमोशनसाठी मिळालेलं ‘बिग तिकीट’ ठरेल यात शंका नाही.
टॉकीज बिग तिकीट’ या अनोख्या संकल्पनेबाबत बोलताना झी टॉकीजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले, मराठी चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मिळावा म्हणून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही टॉकीज बिग तिकीट’ ही अनोखी संकल्पना आणली. याचा फायदा मराठी चित्रपटांना निश्चितच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...