महापौर प्रशांत जगताप यांची महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मंगळवार पेठ प्रभाग २३ च्यावतीने त्यांचा शाल; श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले . पुणे महापालिका भवनमधील महापौर कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला . यावेळी राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचे युवा नेते शशिकांत भिसे , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस जनार्दन जगताप , चिटणीस रणजित परदेशी , कार्यकर्ते मौलाना इब्राहीम , मयुर मेमाणे ,विकास झेंडे , गंगाराम साबळे , विजय कांबळे , शुभम भोसले , भारत परदेशी , भारत जगताप , किशोर गोसावी , सनी देढे , अनिल कांबळे , परशुराम परदेशी आदी उपस्थित होते .
मंगळवार पेठमधील नागरी समस्यांची महापौर प्रशांत जगताप यांच्याशी शशिकांत भिसे यांनी चर्चा केली . या भागातील झोपडपट्टी पुनर्वसन , पाणी पुरवठा , शौचालय दुरावस्था , सिमेंट क्रॉकीटीकरण , मंगळवार पेठमधील भाजी मंडईचे पुनर्वसन , रेल्वेभराव लगतच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन , जुना बाजारचे नव्याने बांधणी करून स्थानिकांना रोजगार मिळण्याची मागणी , डेंगळे पुलास समांतर पूल बांधण्याची मागणी , मंगळवार पेठ गाडीतळ चौकात वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी भव्य उड्डाणपूल बांधण्याची मागणी , महिला व युवकांना रोजगार मिळण्याची मागणी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . महापौर प्रशांत जगताप यांनी सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले .

