पुणे, दि. 29 : भोसरी एमआयडीसीमध्ये सिपी पॉलीयुरेटिन्स प्रा. लि. या कंपनीत वीजमीटरमध्ये फेरफार करून 30,000
युनिटस्च्या 3,59,220 रुपयांची वीजचोरी झाल्याचे नुकतेच उघड झाले. याप्रकरणी महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे
याबाबत माहिती अशी, की भोसरी एमआयडीसीमधील सिपी पॉलीयुरेटिन्स प्रा. लि. ही कंपनी
महावितरणची उच्चदाब वीजग्राहक आहे. या कंपनीत विजेच्या वापराची नोंद होऊ नये यासाठी वीजमीटरमध्ये फेरफार
करण्यात आल्याचे निदर्शनात आले. सिपी कंपनीने मीटरमध्ये फेरफार करून 26 मार्च ते 20 एप्रिल 2015 या कालावधीत
30,000 युनिटस्च्या विजेची चोरी केल्याचे आढळून आले आहे. या वीजचोरीप्रकरणी सिपी कंपनीला 3,59,220 रुपयांचे
देयक देण्यात आले व त्याचा कंपनीने भरणा केला आहे. तथापि वीजचोरी केल्याप्रकरणी सिपी कंपनीचे संचालक सुभाष
सिपी तसेच एस. बी. घोरपडे, एस. बी. गायकवाड व इतर यांच्याविरुद्ध महावितरण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 24)
भारतीय विद्युत कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.