पुणे-गिरीश बापट बोले पोलीस हाले… बापट यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी कॉंग्रेसच्या आंदोलकांना दूरवरच रोखल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमित शहा यांना या आंदोलकांचे जरासेही वारे लागता कामा नये अशा पद्धतीनेच पोलिसांनी हे आंदोलन दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला . भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला होता यावेळी काँग्रेसने काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरु केले. परंतु आंदोलन करिता ठरवून दिलेली जागा बदलल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वादाचा प्रकार देखील घडला. लोकशाहीमध्ये आंदोलन दाबून टाकण्याचा प्रकार भाजपकडून करण्यात आल्याचे आजच्या घटनेमधून घडले आहे. अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली आहे.
बापट यांच्या सांगण्यानुसारच कॉंग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी अडविले .
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी बालगंधर्व चौकातील जागा ठरवून दिली होती. काँग्रेस पक्षाचा मोर्चा ऐनवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर भवन येथे अडवण्यात आला. बॅरिकेट्स टाकून सर्वांना तिथेच अडविण्यात आले.
याविषयी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या अपेक्षा आणि समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकार मधील भ्रष्टाचारामध्ये अडकले असताना त्यांना पक्ष क्लीन चीट देते. अशा नेत्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. तर आज करण्यात येत असलेले आंदोलन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सांगण्यावरून दाबण्याचा प्रयत्न गेला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गुन्हेगार शहा, भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणारे सरकार, अल्पसंख्यांकांचा द्वेष करणारे सरकार अशा घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर अमित शहा यांची बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात जात असताना काळे झेंडे दाखवत घोषणा देत निषेध व्यक्त केला.