पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पवित्र झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली आज त्यांच्या 49व्या स्मृतिदिनानिमित्त नागरिकांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. पाच हजारहून अधिक सावरकरप्रेमींनी आज या वास्तुला भेट देऊन अभिवादन केले.
इतिहास प्रेमी महामंडळाने मिलिंद शेटये यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्रांतिसूर्य सावरकर’ हा नाटयप्रयोग सादर केला. सिंहगडावरील मित्रांसोबची सहल, लोकमान्य टिळकांची भेट, विदेशी कपडयांची होळी, जयोस्तुते गीताची निर्मिती आदी सावरकरांच्या महाविद्यालयीन जीवनातील घटना सादर केल्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. आनंद भिडे, नियामक मंडळाचे सदस्य राम निंबाळकर, डॉ. शरद कुंटे, डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, सावरकरांचे अनुयायी श्री. म. जोशी यावेळी उपस्थित होते.