पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विभागाचे शहराध्यक्ष चैतन्य ऊर्फ सनी अशोक मानकर यांनी प्रभाग क्रमांक 35 (दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल) परिसरातील कचरा प्रश्नावरील कारवाईसाठी वारजे -कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयात निवेदन सादर केले. पी.पी.श्रीमल (वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे आरोग्य अधिकारी) यांना निवेदन दिले.
‘प्रभाग क्रमांक 35 मध्ये कचर्याचे ढीग साचलेले दिसत आहे. कचर्याचे ढीग मोकळ्या मैदानावर, पादचारी मार्गावर, लहान मुलांच्या शाळेसमोर पडले आहेत. या कचर्याच्या ढिगांमुळे अनेक प्रकारची दुर्गंधी पसरत असून, नागरिकांना त्याचा त्रास व विविध रोगांना तोंड द्यावे लागत आहे.
ज्ञानदा शाळा नवसह्याद्री मैदानासमोर, 100 फुटी डी.पी. रोड बनियन ट्री हॉटेलजवळ, रानडे लॉन्स मातोश्री वृद्धाश्रमासमोर (पादचारी मार्ग), पंडीत दिनदयाळ शाळा, अभिनव इंग्शिल शाळेजवळ, भरत कुंज सोसायटीच्या हॉलजवळ (एच. डी.एफ. सी बँकसमोर), डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ (पटवर्धन बाग) या भागातील कचर्याच्या ढीगाची लवकरात लवकर साफसफाई करून महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाईचे फलक लावावेत. तसेच प्रभागात कचर्याच्या समस्या सोडविण्यासाठी घंटागाड्यांच्या संख्येत वाढ करावी, ज्यामुळे नागरिक अशा ठिकाणी कचरा टाकणार नाहीत’, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.