पुणे – राज्यात शनिवारीआणि रविवारी अनेक भागांत अवकाळी पावसानेथैमान घातले शनिवारी दुपारनंतर मुंबईसह रत्नागिरी, सातारा, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत असून, आज (रविवार) सकाळीही पाऊस पडत होता. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात दिवसभर वातावरण ढगाळ होते. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुरळक पावसाने हजेरी लावली. पण, त्यानंतर पावसाचा जोर वाढला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात 8.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.
मध्य अरबी समुद्रात पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे, तर दुसरीकडे बिहारपासून विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे पूर्व किनारपट्टी वगळता संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्यातील दिवस रात्रीच्या तापमानात किंचित घट झाली आहे. कोकणात रात्रीच्या किमान तापमानात घट झाली असून, विदर्भात किंचित वाढ झाली आहे, असे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.
जळगाव : खान्देशात दिवसभर ढगाळ वातावरण होते. अमळनेर तालुक्यात सायंकाळी वादळासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्याचप्रमाणे गहू, हरभरा पिकांचेही नुकसान झाले. राज्याच्या काही भागांत गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली : जिल्ह्यातील कडेगाव, पलूस तालुक्यात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. वांगी परिसरात दुपारी अवकाळी पावसाच्या हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने द्राक्षबागांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले. देवराष्ट्रे परिसरासह सोनहिरा खोऱ्यात गव्हाचे नुकसान झाले. ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले असून, तापमानात वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले.
नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले होते. या पावसाचा द्राक्ष बागांबरोबर कांदा, गहू आदी पिकांना फटका बसला. जिल्ह्यातील निफाड, येवला, इगतपुरी, मालेगाव, बागलाण आदी ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले.
सातारा : जिल्ह्यात दुपारपासून सुरू झालेला हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत चालू होता. माण, खटाव, सातारा, वाई, महाबळेश्वर, वाई तालुक्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे ऊसतोडणीची कामे थांबली.