नवी दिल्ली : दैनिक पुण्यनगरी चे कार्यकारी संपादक रामदास ढमाले यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. ढमाले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याविषयी माहिती दिली. शासनाच्या जनसंपर्कासाठी कार्यालयाने समाज माध्यमांचा केलेला प्रभावी उपयोग, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वययाबाबतही माहिती दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री.ढमाले यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

