पुणे :
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर.पाटील (आबा) यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त हिराबाग येथील पक्ष कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. खासदार, शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण अध्यक्षतेखाली शिक्षण मंडळाचे माजी सदस्य विनायक चाचर यांच्या हस्ते आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी राकेश कामठे, कासम शेख, शफी शेख, शंकर शिंदे, आनंद रिठे, मनोज पाचपुते, पै. राजू गिरे, अमोघ ढमाले, नीलेश वरे, मनोज पाचपुते, अभिषेक पळसकर, संजय गाडे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ, सुधीर शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

