पुणे, : गेल्या जूनमध्ये पुणे परिमंडलातील महावितरणच्या 3 लाख 61 हजार 248 वीजग्राहकांनी इंटरनेटद्वारे
तब्बल 66 कोटी 43 लाख रुपयांच्या देयकांचा ऑनलाईन भरणा केला आहे. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
रांगेत उभे राहण्याऐवजी घरबसल्या वीजदेयकांचा भरणा करण्यासाठी महावितरणने इंटरनेटद्वारे ऑनलाईन
बील पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे परिमंडलात ऑनलाईन पेमेंटला मोठा प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर
2014 मध्ये साडेतीन लाख वीजग्राहकांनी वीजदेयकांपोटी तब्बल 52 कोटी 30 लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केला
होता. त्यानंतर जानेवारी ते मे 2015 पर्यंत यात वाढ होऊन जूनमध्ये तब्बल 3 लाख 61 हजार 248 ग्राहकांनी 66
कोटी 43 लाख रुपयांचा ऑनलाईन वीजबील भरणा केला आहे. गेल्या दीड वर्षात पुणे परिमंडलात ऑनलाईन
वीजदेयकांचा भरणा दुपटीने वाढला आहे.
गणेशखिंड मंडलमधील ऑनलाईन पेमेंट करणार्या ग्राहकांची संख्या जूनमध्ये एक लाख 84 हजारांवर गेली
असून त्यांनी 33 कोटी 45 लाखांचा वीजबील भरणा केला आहे. यात सर्वाधिक पिंपरी विभागात 72 हजार 829
ग्राहकांनी 9 कोटी 97 लाख रुपयांचा तसेच शिवाजीनगर विभागात 40 हजार 905 वीजग्राहकांनी 9 कोटी 6 लाख
रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे.
रास्तापेठ मंडलमधील एक लाख 49 हजार 824 ग्राहकांनी गेल्या महिन्यात 26 कोटी 99 लाखांचा ऑनलाईन
वीजबील भरणा केला आहे. यात सर्वाधिक बंडगार्डन विभागात सर्वाधिक 6 कोटी 24 लाख तसेच नगररोड विभागात 6
कोटी 5 लाख रुपयांचा ऑनलाईन वीजबील भरणा झाला आहे. तसेच पुणे ग्रामीण मंडलातील 27 हजार 134 ग्राहकांनी
5 कोटी 99 लाखांचा ऑनलाईन वीजबील भरणा केला आहे.
महावितरणने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर देयकांचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध
करून दिली आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडीट किंवा डेबीट कार्ड किंवा नेटबॅकींगद्वारे वीजदेयके भरण्याची सुविधा
उपलब्ध आहे. ऑनलाईन पेमेंटसोबत ग्राहकांना इमेलद्वारे वीजदेयक प्राप्त करण्याची सोय आहे. किंवा छापील
देयकांऐवजी फक्त इमेलद्वारे वीजबील पाहिजे असल्यास गो-ग्रीन हा पर्याय उपलब्ध आहे. गो-ग्रीनमध्ये देयकात तीन
रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही दंडाच्या रकमेसह देयक ऑनलाईन
भरणाची सोय उपलब्ध आहे. याबाबतची सर्व माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.