पुणे-पुणेकरांसाठी ‘स्मार्ट सिटी ‘ प्रकल्प महत्वाचा आहे असे विद्धान प्रख्यात बांधकाम व्यवसायिक आणि उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी म्हटले आहे स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबतमहापालिकेच्या सभागृहात घटना अत्यंत क्लेशकारक आहे. याकडे राजकारणविरहित दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. देशात केवळ शंभर शहरे स्मार्ट होणार असून, त्यात पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा बदलणार आहे. या प्रकल्पात पुण्याचा समावेश न झाल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. पुण्यात होण्याऱ्या संभाव्य गुंतवणुकीवर विपरित परिणाम होऊ शकतो. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राहण्यासाठी सुयोग्य ठिकाण आहे. गेल्या काही वर्षांत शहराला आलेली मरगळ झटकून टाकून नव्याने शहर घडविण्याची ही मोठी सुसंधी आहे. जगातील अनेक शहरे स्मार्ट होत असताना पुणे त्यात मागे राहू नये असे पुण्यावर प्रेम करणाऱ्यांचे प्रामाणिक मत आहे. या प्रकल्पातून बाहेर पडल्यास आपण हजारो मैल मागे पडू शकतो. हा प्रकल्प कोण राबवत आहे? किती निधी मिळणार आहे? या पेक्षा पुणे स्मार्ट होणार हे महत्त्वाचे आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याने त्यात राजकारण येऊ नये. पुणेकरांसाठी हा प्रकल्प राज्य सरकारने राबवावा.