‘पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2015’ जाहीर अनंतराव अभंग, प्रा.शमसुद्दीन तांबोळी, सुनील जोशी आणि डॉ. मंदार अक्कलकोटकर ठरले मानकरी
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी पी.ए.इनामदार यांचा 70 वा वाढदिवस असून, पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
‘पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2015’ पारितोषिक वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) च्या असेंब्ली हॉलमध्ये सोमवार, दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
यावर्षी ‘मिशन फॉर ट्रास्फॉर्मेशन ऑफ रूरल एरिया’ (‘मित्र’) संस्थेचे प्रमुख, एक हजार शहरे ‘हरित विकसित शहरे’ करण्याच्या संकल्पनेबद्दल अनंतराव अभंग यांना, प्रा.शमसुद्दीन तांबोळी (मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते), दुष्काळी भागातील नद्या पुनरुज्जीवीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सुनील जोशी (संघटक, जलबिरादरी पुणे), डॉ.मंदार अक्कलकोटकर (आयुर्वेदतज्ज्ञ, वृक्षप्रेमी व वनीकरण प्रसारक) यांना ‘पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देण्यात येईल, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष दीपक बिडकर यांनी दिली.
‘पी.ए.इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता पुरस्कारा’चे डॉ. किरण भिसे (प्राचार्य, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी) आणि श्रीमती जयश्री पवार (कर्मचारी, हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट) यंदाचे मानकरी ठरले आहेत.
6 वर्षातील पुरस्कारासाठी चे प्रमुख पाहुणे, निवडले गेलेले मान्यवर आणि त्यांचे कार्य पुढीलप्रमाणे
2009 प्रमुख पाहुणे : मोहन धारिया
– सारंग गोसावी (काश्मीरमधील शैक्षणिक सामाजिक काम)
– मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे सनदशीर लोकशाही पद्धतीचे आंदोलन करणारे व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, विलासबाबा जवळ (जावळी)
2010 प्रमुख पाहुणे : डॉ.विजय भटकर
– पुणे वाहतूक पोलिस शाखेला फेसबुकचा प्रभावी वापर केल्याबद्दल
– महामार्गांवर अपघातात मदत करणारे वाहनचालक फतेह महंमद मुजाहिद (खेडशिवापूर)
2011 प्रमुख पाहुणे : सिंधूताई सपकाळ
-अन्न वाया जाऊ न देणारी ‘बियाँड सेल्फ संस्था’
– कचरामुक्तीचा पुण्यात यशस्वी प्रयोग राबविणार्या ‘जनवाणी’ संस्थेच्या संचालक किशोरी गद्रे
-राज्यातील पहिला महिला साखर कारखाना काढणार्या अॅड. वर्षा माडगुळकर (सातारा)
2012 प्रमुख पाहुणे : डॉ.एस.एन.पठाण
– ‘अक्षरधारा’चे संस्थापक रमेश राठीवडेकर
– दृष्टीहीन संस्थांच्या निधी संकलनात आणि ब्रेल पुस्तक निर्मितीमध्ये मदत करणार्या सकीना बेदी
– माण देशातील दुष्काळाच्या व्यथा ‘सोशल मिडिया’तून सातत्याने पोहोचविणारे पत्रकार-छायाचित्रकार नागेश गायकवाड (आटपाडी)
– हरविलेल्या वाहन शोध प्रक्रियेसाठी संकेतस्थळ निर्माण करणारे अजय खेडेकर (पुणे)
2013 प्रमुख पाहुणे : संजय नहार
-आधुनिक तंत्रज्ञानाला ग्रामविकासाशी जोडण्याच्या कामाबद्दल डॉ. सुधीर प्रभू (अमेरिका)
-अनिता गोखले-बेनिंजर -पुणेे डी.पी., बी.डी.पी. संदर्भात घेतलेल्या पर्यावरणप्रेमी भूमिकेबद्दल
– विनोद बोधनकर आणि ललित राठी यांना ‘सागर मित्र’ संस्थेच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा निर्मूलन कार्यात शाळांचा सहभाग घेतल्याबद्दल
2014 प्रमुख पाहुणे : डॉ. बाबा आढाव
– राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (वंचितांसाठी राजकीय-सामाजिक काम)
– वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने
-कवी रमेश गोविंद वैद्य
– राज्याचे वनसंरक्षक सुनील लिमये
-भंगार मालाच्या व्यवसायातून यशस्वी उद्योजिका झालेल्या बाळू मावशी धुमाळ