पुणे- स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी असावी , यावर पी. एम. पी. एल. कर्मचारी बांधवानी विचार करावा , आतापर्यंत कर्मचारी बांधवानी केलेले कार्य कौतुकास्पद आहे , पुणे शहर स्वछ व सुंदर राहण्याकरिता आपण सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले .
पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे स्टेशन डेपोच्यावतीने दहावा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . या कार्यक्रमास पुणे महानगर परिवहन महामंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे , सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे , पुणे स्टेशन डेपोचे डेपो व्यवस्थापक सतीश गाटे , सचिन राजापुरे , पी. एम. टी. कामगार संघ (इंटक ) चे अध्यक्ष राजेंद्र खराडे , सरचिटणीस नुरुद्दीन इनामदार , खजिनदार शैलेंद्र जगताप , कार्यकारिणी सदस्य विकास देशमुख , राजाभाऊ क्षीरसागर आदी मान्यवर व कामगार वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते .
यावेळी कर्मचारी बांधवांच्या कला , क्रीडा , साहित्य या क्षेत्रात राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय केलेल्या मुलांचा उमेद पुरस्कार देउन गौरविण्यात आले . यामध्ये ऋग्वेद राजेंद्र क्षीरसागर , दिव्या आनंद गोगावले , प्रमिल राजेंद्र बासुरे आदींना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याहस्ते उमेद पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी कर्मचारी बांधवांमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले होते.
यावेळी वर्धापनदिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ क्षीरसागर यांनी केले तर आभार शैलेंद्र जगताप यांनी मानले .