नवी दिल्ली : -भारताविरोधात कारस्थान रचणारी माणसं पाकिस्तानमध्ये आहे, त्यामुळे साहजिकच त्यांना ‘फँटम’ चित्रपटाचं कथानक रुचणार नाही, असा घणाघात अभिनेता सैफ अली खानने केला आहे. ‘फँटम’ चित्रपटाचं कथानक 26/11 च्या हल्ल्यावर आधारित आहे.मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने ‘फँटम’ चित्रपटावर पाकिस्तानात बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका केल्याच्या पार्श्वभूमीवर सैफने प्रतिक्रिया दिली. चित्रपटामुळे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादी देश अशी करत असल्याचा आरोप हाफिज सईदने केला आहे.’पाकिस्तानात बसलेल्या मुंबईवरील हल्ल्याच्या आरोपीला मोठा पडद्यावर कटाचं कथानक पाहण्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य कसा विचार करतात, हे मला माहित नाही’ असंही सैफ म्हणाला. लाहोर कोर्टाने पाकिस्तान सेन्सॉर बोर्ड आणि सरकारला यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.कबीर खान दिग्दर्शित ‘फँटम’ चित्रपटात सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या मुख्य भूमिका आहेत. कबीर आणि सैफ यांना यापूर्वीही पाकिस्तानात बंदीला सामोरं जावं लागलं आहे. कबीर खानच्या ‘एक था टायगर’ तर सैफच्या ‘एजंट विनोद’ला पाकिस्तानात बंदी घातली होती.हुसैन झैदी यांच्या कादंबरीवरील ‘फँटम’ चित्रपटाचं कथानक 26/11 च्या हल्ल्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या कथानकानुसार डॅनियल या भारतीय एजंटवर हाफिज सईदला शोधून मारण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. या सिनेमाचे प्रोमो नुकतेच रिलीज करण्यात आले असून यामध्ये डेव्हिड हेडली, हाफिज सईद, झकी उर रहेमान लख्वी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.