न्यूयॉर्क मधील युनायटेड नेशन्स वूमनच्या मुख्यलयाने केले आनंद बनसोडे चे स्वागत
जनरल डेप्युटी एक्जुकेटीव्ह यूनाइटेड नेशन श्री.रवी करकरा यानी केले अभिनंदन.
भारताचा शिखरवीर आनंद 2 दिवसापुर्वीच जागतिक शांततेच्या मोहिमेतील 5 वे शिखर चढ़ाई साठी अमेरिकेत गेला असून न्यूयॉर्क येथील युनायटेड नेशन्स वूमन मुख्यालयाने त्याला आमंत्रित करून त्याचे अभिनंदन केले आहे. यूनाइटेड नेशन वुमन चे जनरल डेप्युटी एग्जीक्यूटिव श्री.रवी करकरा यांनी आनंदचे मुख्यालयत स्वागत करून त्याच्या कार्याची प्रशंसा केली आहे. एवढ्या तरुण वयात सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या आनंदचे कार्य उल्लेखनिय असून जगातील महिलांच्या सबलिकरणासाठी व स्त्री-पुरुष समानतेसाठी आनंद सारख्या युवकांनी पुढे येवून काम केले पहिजे असे यावेळी श्री.करकरा म्हणाले.
आनंदाची मागची मोहीम ही युनायटेड नेशन्स वूमन च्या हीफॉरशी या मोहिमेला समर्पित होती तसेच या मोहिमेला जाण्यापूर्वी युनायटेड नेशन्स कडून अभिनेता फरहांन अख्तर याने आनंदच्या हाती हीफॉरशी चा लोगो सूपूर्त केला होता. हा फोटो युनायटेड नेशन्स वूमन च्या अधिकार्यानी सोशल मीडिया वर शेअर करून आनंदचे कौतुक केले होते. 27 मे रोजी आनंद अमेरिकेला जाण्यासाठी विमानात बसत असतनाच त्याला मुख्यालयातील श्री. करकरा यांनी सम्पर्क करून भेटण्याची ईच्छा व्यक्त केली. यानंतर आनंदने अमेरिकेत पोहचल्यानंतर त्यांची भेट घेतली.
याभेटीवेळी मूळचे सोलापूरचे असलेले सॉफ्टवेअर इंजीनियर व आनंदचे मित्र औदुंबर गवळी सोबत होते.
“न्यूयॉर्कमधील युनोकडून कौतुक म्हणजे आयुष्यातील सर्वोच्च सन्मान”- आनंद बनसोडे
सोलापूरसारख्या छोट्या शहरातून एव्हडे विक्रम केल्यानंतर युनायटेड नेशन्स वूमनचे न्यूयॉर्क येथील मुख्यालयाकडून कौतुक म्हणजे खूप मोठी बाब असून हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे.