मुंबई -हिंदू हित कि बात करेगा … वोही देश पे राज करेगा …. हि घोषणा आता मावळली जणू… ? कि कृतीत येते आहे ? आणि मुस्लिम हित कि बात करेगा चा नारा च जणू सुरु झाला आहे .? जुन्या जमान्यातील म्हणजे १९७७ ते १९९७ च्या काळातील शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करू पाहणारे ओवेसी आणि त्यांचा एमआयएम हा मुस्लीमांसाठीच देशभर लढावयास निघालेला पक्ष मानला जावू लागला आहे . शिवसेना महाराष्ट्रात प्रथम मराठी माणूस हा मुद्दा घेवून रणांगणात उतरली नंतर हिंदुत्वाची ज्योत त्यांनी प्रज्वलीत केली . भाजप हा पक्ष हि हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो . याच धर्तीवर एम आय एम मुस्लिमांसाठी आता लढा देवू लागली आहे दुसरीकडे या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणासाठी आता शड्डू ठोकत आहेत तर शिवसेनेने मुस्लिमांचे आरक्षण काय मतदानाचा हक्कच रद्द करावा असा विचार हळूच संजय राऊत यांच्या एका लेखाद्वारे सोडून दिला आहे
बाळासाहेब ठाकरे यांची जी ताकद होती ती जणू आजच्या शिवसेनेत उरलीच नाही असे वाटत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची मागणी केल्यामुळे मोठे वादंग माजले आहे. व्होट बँक म्हणून मुस्लिमांचा होणारा वापर टाळण्यासाठी त्यांच्या मतदानाच्या अधिकारावरच बंदी घातली पाहिजे, असे मत राऊत यांनी लिहिलेल्या लेखात मांडले आहे.तर
‘आघाडी सरकारने मराठा समाजासह मुस्लिमांना दिलेले आरक्षण भाजप सरकारला कायम ठेवता आले नाही. तर उलटपक्षी दिलेले हे आरक्षणही काढून घेण्यात आले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या मुस्लिम बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे. मुस्लिम आरक्षणाच्या निर्णायक लढ्यायासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाची तयारी करावी’, अशी हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी दिली आहे .
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने मुस्लिम आरक्षण परिषद बोलावण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.आघाडी सरकारने नोकरी आणि शिक्षणात मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दिले. पण, कोर्टाने त्यास स्थगिती दिल्यानंतर भाजप सरकारने केवळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून मुस्लिम समाजावर अन्याय केला. या दोन्ही समाजाला आरक्षणाची गरज आहे. पण, सरकार मुस्लिम आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारला याबाबतचा धडा शिकण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.दरम्यान, या आरक्षण परिषदेत खासदार तारिक अन्वर यांनीही सरकारच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. तर, प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, ‘गोवंश हत्याबंदीपेक्षाही आरक्षणाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. मुस्लिम समाजाचे आरक्षण नाकारलेच नाही तर हिरावून घेतले आहे. भविष्यात भाजपला मुस्लिम समाज धडा शिकवेल’.या परिषदेला राज्यभरातून मुस्लिम समाजाचे नेते आणि कार्यकर्ते निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जलालुद्दीन सय्यद यांनी या परिषदेमागील भूमिका स्पष्ट केली.
मुस्लिमांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणारा राष्ट्रवादी हा एकमेव राजकीय पक्ष असल्याचे सांगत, पक्षाच्या व्यासपीठावरून व पाठबळाने मुस्लिम आरक्षणाचा लढा तीव्र करण्यात येईल, असे सय्यद यांनी सूचित केले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची मागणी केल्यामुळे मोठे वादंग माजले आहे. व्होट बँक म्हणून मुस्लिमांचा होणारा वापर टाळण्यासाठी त्यांच्या मतदानाच्या अधिकारावरच बंदी घातली पाहिजे, असेमत राऊत यांनी लिहिलेल्या लेखात मांडले आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवेसी यांची ‘विषारी साप’आणि त्यांच्या पक्षाची ‘सापांचे वारुळ’ अशा शब्दांत संभावना केली आहे. राऊत यांच्या या भूमिकेवर सर्वच पक्षांनी कडाडून हल्ला केला असून लोकांत फूट पाडण्याचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
लोकांच्या भावना भडकावून त्यांच्यात फूट पाडण्याचे शिवसेनेचे हे कारस्थान आहे. अशा शक्तींना भारतीय समाजात अजिबात स्थान नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत वारंवार आश्वासने देऊनही अशा वादग्रस्त वक्तव्यांची हेतुत: पुनरावृत्ती केली जात असल्याचेही काँग्रेसने संजय राऊत यांचा निषेध करताना म्हटले आहे. एकीकडे असा हिंदू -मुस्लिम वाद राजकीय स्तरावरून पेटवून दिला जात असताना सर्वाधिक -आणि ऐतिहासिक बहुमताने सत्ता मिळवलेल्या भाजपकडून किंवा नरेंद्र मोदींकडून मात्र याबाबत काहीही दिशा देण्याचे व भूमिका स्पष्ट करण्याचे काम होताना दिसत नाही . असा आरोप होतो आहे . नरेंद्र भाई क्यू चूप है ? असाच प्रश्न यावा उपस्थित होण्यासारखा आहे
दरम्यान सत्तेच्या आणि एकंदरीत देशाच्या राजकारणात पुन्हा हिंदू -मुस्लिम भेद आणि वादाला फोडणी देण्याचे काम राजकीय स्तरावरून होत असल्याचे दिसते आहे मानवता हा धर्म; माणुस ही जात हे तत्व या राष्ट्रात कधी मानले जाईल अशी स्थिती जवळपास दिसत नाहीच