पुणे : येत्या १५ ते १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आता दरवर्षी पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीत साहित्य संमेलन भरवणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी केली.
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डी. वाय. पाटील विद्यापीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी शाखेच्या वतीने एक दिवसीय संमेलनपूर्व संमेलानात त्यांनी ही घोषणा केल्यामुळे आता दरवर्षी जानेवारीत संमेलनोत्तर संमेलनाचा लाभ पिंपरी-चिंचवड येथील साहित्यप्रेमी नागरिकांना होणार आहे.
८९व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व संमेलनपूर्व संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दरवर्षी पिंपरी चिंचवडमध्ये संमेलन घेण्यात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशी इच्छा आपल्या भाषणात व्यक्त केली होती.
चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहातील या भरगच्च सोहळ्यात डॉ. पाटील अध्यक्षीय समारोपात बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन ८८व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि पिंपरी येथे नुकत्याच पार पडलेलया २४ व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महामंडळाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन तसेच ८९व्या साहित्य संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेश्च्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनीही आपले विचार मांडले.
मु‘य कार्यक‘मापूर्वी चिंचवड येथी वखार महामंडळापासून ग‘ंथ दिंडी काढण्यात आली. पालखीमध्ये भगवतगीता व ज्ञानेश्वरी हे ग‘ंथ ठेवण्यात आले. या दिंडीत पिंपरी चिंचवडमधील लेखिका विनिता ऐनापुरे, संत साहित्याच्या अभ्यासिका सुचेता गटणे, कवयित्री अश्विनी रानडे इत्यादी मंडळी उपस्थित होती. तसेच थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण व के. जे. चावला माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात व लेझिम वाजवत या दिंडीत सहभाग घेतला.
आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. पाटील म्हणाले की, यंत्राच्या खडखडाट करणार्या पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीचे रुपांतर एव्हाना साहित्य नगरीत होत असून तिथे यापुढेही साहित्यिकांच्या स्वरांचा सुगंध दरवळला पाहिजे. तसे वातावरण निर्माण करण्यासाठीच संमेलनपूर्व संमेलन घेत आहोत. १५ ते १८ जानेवारी रोजी होणार्या मु‘य संमेलनाची कार्यक‘मपत्रिका येत्या दोन दिवसांमध्ये वितरीत करण्यात येईल.
डॉ. पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील शाळांमधील वाचनालयांसाठी १२ हजार पुस्तकांचे वाटप करणार असून त्यात लोकनेते शरद पवारांचे आत्मकथन, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या पुस्तकांचाही समावेश असेल. यातून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी हा हेतू आहे.
डॉ. सबनीस यांनी डॉ. पाटील, तसेच संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांच्या नियोजनाचे कौतुक करताना सांगितले की, ८९ व्या संमेलनाचा मानदंडच या जोडीच्या अखंड मेहनत व कल्पकतेने बदलून गेले आहेत. साहित्य संमेलनाच्या पूर्वाध्यक्षांनाही हेवा वाटेल असे डॉ. पाटील यांच्यासारखे स्वागताध्यक्ष पुढच्या संमेलनांना क्वचितच लाभतील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
संमेलनाच्या निमित्ताने आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या कुटुंबियांबाबत वाटणार्या कळवळ्यातूनच डॉ. पाटील यांनी ७० लाख रुपयांचा निधी हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना आहे, या शब्दात त्यांनी कौतुक केले. हे संमेलन फुले, आंबेडकरांच्या विद्रोही तसेच न्यायमूर्ती रानडे यांच्या अभिजन विचाराचा समन्वय साधणारे आहे, असेही ते म्हणाले.
नाविन्यपूर्ण व उंची गाठणारे संमेलनपूर्व संमेलन हे मान्सूनपूर्व मान्सून सारखे साहित्याबद्दल उत्सुकता निर्माण करत असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील श्रमिक यातून साहित्य व कलेकडे वळू शकतील असे वातावरण निर्माण होत आहे.
साहित्याचा हा प्रस्थान सोहळा असून श्रमसंस्कृतीने शब्दसंस्कृतीशी समन्वय साधला आहे, या शब्दात संमेलनपूर्व संमेलनाचे कौतूक डॉ. देखणे यांनी केले. तर ८९व्या संमेलनामुळे आता संत नामदेव, सावरकर यांच्याबरोबर ज्ञानेश्वर व तुकाराम हे आणखी दोन संत आणि त्यांनी पावन केलेली भूमी जोडली जात आहे, असे डॉ. वैद्य म्हणाल्या.
नृत्यकार नंदकुमार कपोते व त्यांच्या सहकार्र्यांनी गणेशवंदनेने कार्यक‘माची सुरुवात झाली, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी शाखेचे कार्यवाह नितीन यादव यांनी आभार मानले.