पोर्ट एलिझाबेथ-दक्षिण आफ्रिकेतील एका शहरात तीन महिलांनी पुरुषावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या महिलांनी अपहरण करून त्याच्यावर बलात्कार केला. त्या पुरुषाचं वीर्य मिळवण्यासाठी महिलांनी त्याच्यावर बलात्कार केल्याचं सांगण्यात येतंय.असा प्रकार यापूर्वी कधी घडलेला नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण दक्षिण आफ्रिकेत पुरुषांचं वीर्य मिळवण्यासाठी महिलांकडून बलात्कारच्या घटना वाढल्या आहेत. हा नवा ट्रेन्डच तिथे सुरू झाला आहे.
एका आलिशान BMW गाडीतून या तीन महिला आल्या. त्यांनी त्या पीडित ३३ वर्षीय पुरुषाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीजवळ बोलवलं. गाडीजवळ येताच त्या पैकी एका महिलेने त्याला डोक्याला पिस्तूल लावलं आणि धमकावून त्याला गाडीत बसवलं. यानंतर नशेचं पेय देऊन त्या पीडित पुरुषाला अज्ञात स्थळी नेलं. एकेक करून या तिन्ही महिलांना त्याच्यावर सतत बलात्कार केला. यावेळी त्या महिलांनी त्याचं वीर्य प्लॅस्टीक बॅगमध्ये जमा केलं आणि एका कुलर बॉक्समध्ये घेऊन त्या फरार झाल्या.
पोर्ट एलिझाबेथमधील क्वाझाखेल टाउनशिपमधून त्या पुरुषाचं अपहरण करण्यात आलं आणि तो राहत असलेल्या ठिकाणापासून किमान ५०० किलोमीटर अंतरारवर त्याला एका निर्जन स्थळी सोडून आरोपी महिला गाडीतून फरार झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अजून कोणालाही अटक झालेली नाही.
महिलांनी पुरुषाचं अपहरण करून एका अज्ञात स्थळी गाडी थांबवली आणि त्याच्याशी सेक्स करण्याच प्रयत्न केला. पण घाबरलेल्या परिस्थितीत त्याच्या मनात कुठलीही भावना निर्माण झाली नाही. त्यामुळे त्या महिलांनी त्याला उत्तेजक द्रव्य पाजलं. आणि त्याची इच्छा नसतानाही त्याच्यावर अत्याचार केला. या सर्व प्रकारात तो पुरुष शुद्धीवर होता.