पुणे,भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटकच्या श्रीहरी नटराज व पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडल यांनी नव्या विक्रमासह सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्राच्या रेना सलढाणा, त्रिशा कारखानीस, आर्यन भोसले, केनिशा गुप्ता, निल रॉय यांनी सुवर्णपदक पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 400मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या रेना सलढाणाने 4.45.42सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर तामिळनाडूच्या अभिशिक्ता पी.एम व दिल्लीच्या प्राची टोकस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात दिल्लीच्या खुशी दिनेशने 4.41.73सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले तर आसामच्या आस्था चौधरी व कर्नाटकच्या पुजीता मुर्तीने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
4×100 मी मिडले रिले प्रकारात मुलांच्या 13-14 वयोगटात 1 कर्नाटक संघाने 4.14.69सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर महाराष्ट्राच्या संघाने 4.24.81सेकंद वेळेसह रौप्य पदक पटकावले. पश्चिम बंगाल संघाने 4.26.73सेकंदासह कांस्य पटकावले.
200मी फ्रीस्टाईल प्रकारात कर्नाटकचे वर्चस्व मुलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या राहूल एम याने 1.56.25सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर दिल्लीच्या कुशाग्रा रावतने रौप्य पदक पटकावले तर महाराष्ट्रच्या आरोन फर्नांडीसला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या तनिश मॅथ्युने 2.01.46सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तामिळनाडूच्या लिओनार्ड व्ही व हरियाणाच्या वीर खाटकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
200मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीसने 2.27.53सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले तर पश्चिम बंगालच्या सौब्रीती मोंडल व कर्नाटकच्या झानती राजेश यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात दिल्लीच्या तनिशा मालवीयाने 2.28.98सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर कर्नाटकच्या सुवाना बस्कर व गोव्याच्या शृंगी बांदेकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
200मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने आपलाच 2.05.18 सेकंदाचा विक्रम मोडीत काढत 2.04.11सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. श्रीहरीने सकाळच्या सत्रात झालेल्या प्राथमीक फारीत 2.05.18सेकंदाचा विक्रम केला होता. मध्य प्रदेशच्या अव्दैत पागे व गोव्याच्या झेविअर डिसुझा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगट महाराष्ट्राच्या आर्यन भोसलेने 2.11.97सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. आर्यनने सकाळच्या सत्रात झालेल्या प्रथमीक फेरीत 2.13.77 सेकंदाचा विक्रम केला होता. तर महाराष्ट्राच्याच वेदांत बापनाने 2.13.50सेकंदासह रौप्य पदक संपादन केले. पंजाबच्या आकाशदिप सिंगने कांस्य पदक पटकावले.
200मी मिडले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी बाजी मारली. मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या रेना सलढाणाने 2.29.88सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या तन्वी तांत्री व झानती राजेश यांनी 2.33.55सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगट महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने 2.31.34सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तेलंगणाच्या जान्हवी गोली व महाराष्ट्रच्या सिया बिजलानीने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
200मी मिडले प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या निल रॉयने 2.11.16सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. निल जमुनाबाई शाळेत अकरावी इयत्तेत शिकत असून खार जिमखाना येथे प्रशिक्षक देवदत्त लेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. गतवर्षी त्याने बेस्ट स्विमरचा पुरस्कार पटकावला होता. तर वेदांत खांडेपारकरने 2.13.56सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले. कर्नाटकच्या सीवा एस याने 2.14.43सेकंदासह रौप्य पदक पटकावले.
200मी मिडले प्रकारात मुलांच्या 13-14 वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने 2.15.28सेकंद वेळ नोंदवत महाराष्ट्राच्या निल रॉयचा 2015 सालचा 2.17.20सेकंदाचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक संपादन केले. महाराष्ट्रच्या आर्यन भोसलेने 2.18.79सेकंदासह रौप्य तर गुजरातच्या आर्यन नेहराने कांस्य पदक पटकावले.
100मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या रिध्दी बोहराने 1.16.67सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर सलोनी दलालने 1.16.90सेकंदासह रौप्य पदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या आलिया सिंगने कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात तामिळनाडूच्या आदिती बालाजीने 1.17.97सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर कर्नाटकच्या रचना राव व शानीया शिरोमणी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
100मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात तामिळनाडूच्या दानुश एस याने 1.05.84सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर आसामच्या मिलांतोन दत्ता व कर्नाटकच्या मानव दिलिप यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने 1.10.50सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर कर्नाटकच्या लिथिश गौडा व उत्तर प्रदेशच्या अभिषेक कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
400मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. रेना सलढाणा(महाराष्ट्र, 4.45.42से), 2. अभिशिक्ता पी.एम(तामिळनाडू, 4.47.62से), 3. प्राची टोकस(दिल्ली, 4.47.94से)
400मी फ्रीस्टाईल मुली(13-14 वयोगट)- 1. खुशी दिनेश(दिल्ली, 4.41.73से), 2. आस्था चौधरी(आसाम, 4.46.91से), 3. पुजीता मुर्ती(कर्नाटक, 4.50.91से)
4×100 मी मिडले रिले मुले(13-14 वयोगट)-1. कर्नाटक(शिवांश सिंग, लितेश गौडा, प्रसिधा कृष्णा पी.ए, तनिश मॅथ्यु, 4.14.69से), 2. महाराष्ट्र(वोदांत बापना, सुदर्शन हर्शित, यश गल्हानी, आर्यन भोसले, 4.24.81से), 3. पश्चिम बंगाल(नितेश भौमिक, आरिंदम दास, स्वदेश मोंडल, साकील सरदार, 4.26.73से)
200मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1. राहूल एम(कर्नाटक, 1.56.25से), कुशाग्रा रावत(दिल्ली, 1.56.35से), 3. आरोन फर्नांडीस(महाराष्ट्र, 1.57.26से)
200मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. तनिश मॅथ्यु (कर्नाटक, 2.01.46से), लिओनार्ड व्ही(तामिळनाडू, 2.04.65से), 3. वीर खाटकर(हरियाणा, 2.04.95से)
200मी बॅकस्ट्रोक मुली(15-17 वयोगट)- 1. त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 2.27.53से), 2. सौब्रीती मोंडल(पश्चिम बंगाल, 2.30.13से), 3. झानती राजेश(कर्नाटक, 2.30.27से)
200मी बॅकस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1. तनिशा मालवीया(दिल्ली, 2.28.98से), 2. सुवाना बस्कर(कर्नाटक, 2.31.19से), 3.शृंगी बांदेकर(गोवा, 2.31.81से)
200मी बॅकस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1. श्रीहरी नटराज(कर्नाटक, 2.04.11से), 2.अव्दैत पागे(मध्य प्रदेश, 2.09.29से), 3. झेविअर डिसुझा(गोवा, 2.11.94से)
200मी बॅकस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. आर्यन भोसले(महाराष्ट्र, 2.11.97से), 2. वेदांत बापना(महाराष्ट्र, 2.13.50से), 3. आकाशदिप सिंग(पंजाब, 2.18.51से)
200मी मिडले मुली(15-17 वयोगट)- 1. रेना सलढाणा(महाराष्ट्र, 2.29.88से), 2. तन्वी तांत्री(कर्नाटक, 2.31.73से), 3. झानती राजेश(कर्नाटक, 2.33.55से)
200मी मिडले मुली(13-14 वयोगट)- 1. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 2.31.34से), 2. जान्हवी गोली(तेलंगणा, 2.33.08से), 3. सिया बिजलानी(महाराष्ट्र, 2.34.48से)
200मी मिडले मुले(15-17 वयोगट)- 1. निल रॉय(महाराष्ट्र, 2.11.16से), 2. वेदांत खांडेपारकर(महाराष्ट्र, 2.13.56से), 3.सीवा एस(कर्नाटक, 2.14.43से)
200मी मिडले मुले(13-14 वयोगट)- 1. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, 2.15.28से), 2. आर्यन भोसले(महाराष्ट्र, 2.18.79से), आर्यन नेहरा(गुजरात, 2.20.30से)
100मी ब्रेसस्ट्रोक मुली(15-17 वयोगट)- 1. रिध्दी बोहरा(कर्नाटक, 1.16.67से), 2.सलोनी दलाल(कर्नाटक, 1.16.90से), 3. आलिया सिंग(उत्तर प्रदेश, 1.18.79से)
100मी ब्रेसस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1.आदिती बालाजी(तामिळनाडू, 1.17.97से), 2. रचना राव(कर्नाटक, 1.19.65से), 3. शानीया शिरोमणी(कर्नाटक, 1.21.43से)
100मी ब्रेसस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1. दानुश एस(तामिळनाडू, 1.05.84से), 2. मिलांतोन दत्ता(आसाम, 1.08.17से), 3. मानव दिलिप(कर्नाटक, 1.08.22से)
100मी ब्रेसस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, 1.10.50से), 2. लिथिश गौडा(कर्नाटक, 1.12.73से), 3. अभिषेक कुमार(उत्तर प्रदेश, 1.13.29से)
4X100 मी मिडले मुले(15-17 वयोगट)- 1. कर्नाटक(श्रीहरी नटराज, अनिरुध्द एच.एम, पृथ्विक डी.एस, राहूल एम, 4.01.31से), 2. महाराष्ट्र(दिविज टेकवडे, मिहिर आंब्रे, आभिनंदन दळवी, निल रॉय, 4.03.72से), 3. तामिळनाडू(कौशिक विक्टो, आदित्य डी, धनुष एस, गोकुळनाथ व्ही.एस, 4.03.76)