लेखक – दर्शन मुसळे यांच्याकडून …
भारताच्या भविष्याची पुनर्बांधणी करणे हे उद्दिष्ट असणाऱ्या ‘भारत पुनर्निर्माण ‘ यांनी रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आज भारतापुढील सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे ‘बेरोजगारी ‘. मनोरंजन उद्योगात लाखो महत्वाकांक्षी अभिनेते ,गायक ,लेखक ,नर्तक ,संगीतकार ,कला दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञ असे आहेत की ज्यांच्याकडे कौशल्य आहे पण ते सिद्ध करण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. याच क्षेत्रातील या समस्येवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे . ‘मिशल ‘ म्हणून सर्वांना परिचित असलेल्या हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपट निर्मात्या नंदिता सिंघा यांनी ‘भारत पुनर्निर्माण’ च्या माध्यमातून होतकरू आणि योग्य कौशल्याला खरोखरच संधी देण्याची प्रतिज्ञा घेतली आहे . याच संकल्पनेतून त्यांनी ‘ रेड ‘चित्रपटातील प्रमुख कलाकारांपैकी एक कलाकार संजय मौर्य याची निवड केली आणि ‘ रेड ‘ चित्रपट स्वीकारल्यानंतर त्याची अनेक चित्रपटांसाठी ‘नायक ‘म्हणून निवड झाली. या वर्षी ‘गांधी जयंती”च्या निमित्ताने नंदिता सिंघा यांच्या ‘रेड ‘ चित्रपटाचा टीझर जगभरात प्रदर्शित झाला .हा टीझर म्हणजे ‘गुन्हा अन्वेषण पत्रकारिता ‘ अर्थात ‘क्राइम जर्नलिझम ‘च्या माध्यमातून महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाला वाहिलेली आदरांजली आहे. हा चित्रपट बनविताना नंदिता सिंघा यांना एक गोष्ट लक्षात आली की भारतातील विविध भागात खूप उत्तम दर्जाची कला आहे ,कौशल्य आहे आणि अशा लोकांना त्यांच्या चित्रपटात देखील संधी मिळू शकते .
‘नुक्कड नाटक ‘ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जुन्या पारंपरिक पथनाट्य कलेला सुद्धा त्यांना पुनरुज्जीवित करायचे आहे . ‘नुक्कड नाटक ‘ हा आपला पारंपरिक वारसा आहे कारण त्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो . अशा प्रकारे ‘प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील ‘बेरोजगारी ची समस्या सोडवली जाऊ शकते . जे पथनाट्य आणि लोकनाट्य या माध्यमातून आपली कला सादर करू शकतात त्यांना त्यांचे उपजीविकेचे साधन उपलब्ध होऊ शकते आणि अशा प्रकारे उत्कृष्ट अभिनेत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हॉलीवूड ,बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते .
‘भारत पुनर्निर्माण ‘ या उपक्रमाची संकल्पना नंदिता सिंघा यांची असून त्यांचा भारतातील दिवितीय आणि तृतीय स्तरातील शहरे ,चतुर्थ स्तरातील नगरे आणि तळागाळातील सर्व गावे येथून खरे कला कौशल्य शोधून काढण्यावर ठाम विश्वास आहे . जी गावे उपजीविका ,आरोग्य ,कुटुंब नियोजन ,स्त्री भ्रूणहत्या ,जातीयता वाद ,हुंडा ,जादूटोणा ,रोगराई अशा सामाजिक समस्यांशी संबंधित आहेत ,त्यांच्यापर्यंत पोचण्याचा हा पहिलाच उपक्रम असेल .
जे तरुण पदवीधर असून सुद्धा बेरोजगार आहेत आणि दिशाहीन झाल्याने गोंधळलेले आहेत ,त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो यावर त्यांचा विश्वास आहे. अभिनयाची नैसर्गिक देणगी असणारे अनेक अभिनेते आपण पाहिले आहेत की जे आता या क्षेत्रात मोठे झाले आहेत ,पण लोकांपर्यंत नुसते माहित होण्यास त्यांना दहा वर्षांहून अधिक वर्षे संघर्ष करावा लागला आहे आणि त्यानंतर त्यांना बॉलीवूड मध्ये चांगली भूमिका मिळाली आहे . पथनाट्यात काम करायची संधी देऊन अशा लोकांचा या क्षेत्रातील प्रवास आपण सोपा करूया आणि जर ते खूप चांगले कलाकार असतील ,तर आपल्या अनेक चित्रपटात आपण त्यांना संधी देऊया. त्यामुळे त्यांना जास्त वर्षे या क्षेत्रात संघर्ष करावा लागणार नाही . अभिनयाचे कौशल्य असणाऱ्या आणि प्रसार माध्यमाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अठरा वर्षावरील सर्वाना त्या व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतात आणि मासिक वेतन तत्वावर पगारपत्रिकेवर सुद्धा नियुक्त करू शकतात .तसेच त्यांची टीम या सर्वांचे कौशल्य वृद्धिंगत करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन सुद्धा करू शकते. तेव्हा पालकांनो ,जर तुमचे मुल हे शाळेतील ‘टीनएजर ‘असेल आणि त्यांनी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करावे असे तुम्हाला वाटत असेल तर ‘गेट कनेक्टेड ‘हे त्याचे उत्तर आहे . जर तुमच्या मुलाच्या अंगी अभिनय,गायन ,नृत्य ,कला ,लेखन या क्षेत्राशी संबंधित कोणतीही कला असेल तर तुमची चिंता संपली असे समजा . तुमच्या मुलाच्या कलाकौशल्याला स्टारडम पर्यत नेण्याकरिता जो मार्ग आहेत ,त्यात कोणतेही मध्यस्थ नाहीत . मग वाट कसली पाहता ?’लेट्स गेट कनेक्टेड ‘. कदाचित हे जग ज्या पुढल्या स्टारची प्रतीक्षा करत आहे ,ते तुमचे मुल असू शकते. आम्ही ज्या गोष्टीचा प्रचार करतो ,ते प्रत्यक्षात आणण्याकरिता आम्ही आमच्या दोन्ही वेबसाईट्स अर्थात आमची दोन्ही संकेतस्थळे ‘भारत पुनर्निर्माण ‘ आणि ‘गेट कनेक्टेड ‘ launch करत आहोत.
ही संकेतस्थळे आहेत – www.bharatpunarnirman.com ‘and ‘ www.getconnectedindia.com‘. ‘गेट कनेक्टेड ‘प्रोग्राम साठी ,भ्रमणध्वनी app सुद्धा उपलब्ध आहे .