तब्बल अकरा वर्षानंतर “अगं बाई अरेच्चा २” प्रेक्षकांच्या भेटीला!!
श्रीयुत गंगाधर टिपरे नंतर पुन्हा एकदा धमाल करणार दिलीप प्रभावळकर आणि केदार शिंदे यांची लेखणी!!
खास महिलादिनाच्या औचित्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सेलिब्रेटी महिलांचा सन्मान!!
“अगं बाई अरेच्चा २” फर्स्ट लूक प्रदर्शित!!
२२ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!!
मान्यवरांच्या मांदियाळीत रंगली सांज !!
“अगं बाई अरेच्चा” काढला तेव्हा मी या चित्रपटसृष्टीत नवा होतो. आजही अकरा वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल काढतानाही मी नवाच आहे. त्यावेळी मी लेखक दिग्दर्शक म्हणून मी नवा होतो, आता निर्माता म्हणून मी नवा आहे. परंतु दोन्ही वेळचा अनुभव अप्रतिम आहे. त्यावेळी बायकांच्या मनातील ओळखले होते, आता प्रेक्षकांच्या मनातील ओळखू शकत आहे. त्यामुळे या चित्रपटालाही पहिल्या भाग ऐवढाच भरघोस प्रतिसाद आताही मिळेल असा विश्वास निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केला.
महिलाप्रधान विषय घेऊन येणाऱ्या या “अगं बाई अरेच्चा २” चित्रपटाचा फर्स्ट लूक महिला दिनाचे औचित्य साधून मोठ्या दिमाखात ९ मार्चला संपन्न झाला. महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सेलिब्रेटींच्या हस्ते गौरव हा समारंभ अनेक ठिकाणी होतो.परंतु चित्रपटसृष्टीला महत्वाचे योगदान दिलेल्या सेलिब्रेटीं चा सन्मान विविध क्षेत्रातील मान्यवर करणार असा आगळा वेगळा उपक्रम याप्रसंगी आयोजित करण्यात आला होता. यावेळी निर्माते नरेंद्र फिरोदिया यांच्या मातोश्री आशा फिरोदिया आणि पत्नी रिंकू फिरोदिया यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी व रोहिणी हट्टंगडी यांचा सन्मान करण्यात आला. उषा नाडकर्णी, वर्ष उसगांवकर, प्रतीक्षा लोणकर, वंदना गुप्ते, अनुराधा पौडवाल, निर्मिती सावंत, वैशाली सामंत, कांचन अधिकारी, प्रतिमा कुलकर्णी, मंगल केंकरे, श्रावणी देवधर, सुचित्रा बांदेकर, चारुशीला साबळे, सोनिया परचुरे, सई ताम्हणकर, सुकन्या मोने, सोनाली कुलकर्णी या सेलिब्रेटींचा सत्कार माजी निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण, वेशभूषाकार गीता गोडबोले, ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर, संकलक भक्ती मायाळू, पत्रकार वैजयंती आपटे, मुंबई माजी महापौर निर्मला सामंत, फिटनेस ट्रेनर लीना मोगरे, सामाजिक कार्यकर्त्या छाया दातार, लेखक दिग्दर्शिका संजीवनी खेर, ज्वेलरी डिझायनर शोभा गोखले, लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, कॉस्मेटोलॉजिस्ट श्रीलता त्रासी, सागरिका म्युझिकच्या सागरिका दास, लेखिका मनीषा कोरडे, डायटेशियन डॉ. सरिता डावरे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महारःत्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, सचिन पिळगावकर, किरण शांताराम, विजय पाटकर अभिनेता शर्मन जोशी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे निर्माते जितेंद्र हरिया यांचा सत्कार आताचे निर्माते नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला तसेच व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई यांचाही सत्कार करण्यात आला.
श्री. राजसाहेब ठाकरे यांनी महिलादिनानिमित्त उपस्थित महिलांना अभिवादन करून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. सुलोचना दीदी यांनी येथे चित्रपट सृष्टीतील अनेक महिलांचा सत्कार केल्याबद्दल निर्मात्यांचे आभार मानले, केदारचे काम नेहमीच वेगळे असते, लोकांनी त्याचे चित्रपट नेहमीच उचलून धरले आहेत यापुढेही त्याला असाच प्रतिसाद मिळेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
मी अजूनही कलाकार, अभिनेता म्हणून नवाच आहे असे मला वाटते. दरवेळी काहीतरी नवीन करायला आणि शिकायला मिळते याचा मला आनंदच आहे केदार शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि वेगळेपणा याविषयी मी खूप ऐकले आहे आणि आता ते अनुभवण्याची इच्छा आहे. असे सांगून केदार शिंदे यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचे सचिन पिळगावकर यांनी सांगितले.
“अशी ही बनवा बनवी” हा चित्रपट पहिला आणि अशा एखाद्या चित्रपटात काम करण्याची इच्छा माझ्या मनात होती. परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. २००४ मध्ये मित्रांच्या जोरावर “अगं बाई अरेच्चा” हा चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला. तो लोकांनी उचलून धरला. या चित्रपटामुळे अनेकांचे या चित्रपटसृष्टीत करिअर सुरु झाले. आता मी निर्मिती क्षेत्रात उतरलो आहे. यात मला नरेंद्र फिरोदिया सारख्या मित्राची मोलाची आणि महत्वपूर्ण साथ लाभली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीयुत गंगाधर टिपरे नंतर मी आणि दिलीप प्रभावळकर यांनी एकत्रितपणे ही संहिता लिहिली आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण संपून आता पुढील प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासाला शुभेच्चा देण्यासाठी आज एवेढे लोक उपस्थित राहिले यासाठी मी सर्वांची आभारी आहे. चित्रपटाचे सर्व श्रेय केदार शिंदे यांचे असून आपल्या क्षेत्रातील माणसांबाबत त्यांना जिव्हाळा आहे. त्यांनी येथील माणसांमध्ये मैत्री रुजवली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाची यापूर्वी माहिती नव्हती पण त्यांच्या सर्जनशीलतेची मी मोठी “फॅन” होते त्यामुळे त्यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा या चित्रपटामुळे पूर्ण झाली
नवीन प्रवास सुरु होत आहे याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा निर्माते नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली. येत्या २२ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.