डीएसके गप्पांना २ एप्रिलपासून प्रारंभ
पुणे : कादंबरीच्या माध्यमातून लाखो वाचकांच्या मनात स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध कादंबरीकार पाटील, छोट्या पडद्यावर अभिनयाची अनोखी छाप पडणारे उदय टिकेकर आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या त्यांच्या पत्नी आरती अंकलीकर – टिकेकर तसेच सामना, सिंहासन, मुक्ता असे संस्मरणीय चित्रपट दिग्दर्शित करणारे डॉ. जब्बार पटेल चार दशक मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या नायिका मधु कांबीकर, सीमा देव, वर्ष उसगावकर या यंदाच्या डीएसके गप्पांचे विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती डीएसके फाउंडेशनच्या सौ. भाग्यश्री कुलकर्णी आणि श्याम भुर्के यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
कुलकर्णी म्हणाल्या कि, डी. एस कुलकर्णी फाउंडेशनतर्फे दरवर्षी होणार्या डीएसके गप्पांचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. पुणे शहराच्या सांस्कृतिक पटलावर डीएसके गप्पांनी मनाचे स्थान मिळवले आहे. यावर्षी २ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान या गप्पांचे म्हात्रे पुलाजवळ घरकुल लॉंन्स येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असल्याचे सांगितले.
डी. एस कुलकर्णी फाउंडेशनतर्फे अव्याहतपणे सुरु असलेल्या या उपक्रमाला आजपर्यंत पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गप्पांच्या या मैफिलीला पुणेकर रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास भाग्यश्री कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.