मराठी रंगभूमीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर यांचे आज (मंगळवार) वृद्धापकाळने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण अशाच सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठस्सा उमटवला होता. ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ आणि ‘शाब्बास बिरबल शाब्बास’, ‘ पंडितराज जगन्नाथ’, ‘बावनखणी’, ‘जय जय गौरिशंकर’, ‘आनंदी गोपाळ’, ‘रक्त नको मज प्रेम हवे’, ही त्यांची नाटके विशेष गाजली. मराठी नाट्य क्षेत्रातील बिरबल म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच कलेचे बाळ कडू मिळाले होते.
नाट्चळवळीला बळकटी दिली
अण्णांनी ऐन उमेदीच्या काळातच ‘ललितकलादर्श नाटकमंडळी’च्या कार्यासाठी स्वत:ला झोकून दिले. या संस्थेची स्थापना १ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी केली होती. ४ ऑक्टोबर १९२१ रोजी केशवरावांचा मृत्यू झाला. दरम्यान, बापुरावांनी संस्थेची धुरा सांभाळाली. पुढे १९३७ साली बापुरावांचे अकाली निधन झाले. आणि १९४२ साली बापुरावांचे चिरंजीव भालचंद्र व्यंकटेश तथा अण्णा पेंढारकरांनी, वयाच्या सोळाव्या वर्षी, कंपनीची सूत्रे हाती घेतली.
संक्षिप्त जीवनपट
जन्म – २१ नोव्हेंबर १९२१.
पुरस्कार –
विष्णुदास भावे पुरस्कार,१९७३
बालगंधर्व पुरस्कार, १९८३
केशवराव भोसले पुरस्कार, १९९०
जागतिक मराठी परिषद, १९९६
संगीत नाटक कला अकादमी, २००४
तन्वीर सन्मान पुरस्कार, २००५
चतुरंग जीवनगौरव पुरस्कार, २००६
प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार, २००६