पुणे :
ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कै.डॉ.वि.वि.(आप्पासाहेब) पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जन्मशताब्दी समितीच्या वतीने रविवार, दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेमध्ये ‘डॉ.आप्पा पेंडसे-अभिवादन यात्रा’चे आयोजन करण्यात आले होते
पुणे शहरासाठी ,शैक्षणिक -सामाजिक -औद्योगिक -एकात्मता -संशोधन क्षेत्रात कै.आप्पा पेंडसे यांनी केलेल्या भरीव योगदानाची पुन्हा आठवण करावी व नव्या पिढीला त्यांची ओळख करून द्यावी या प्रमुख हेतूने समितीच्यावतीने या अभिवादन यात्रेचे आयोजन केले होते
ज्ञान प्रबोधिनी परिसराभोवतीची ही एक प्रतीकात्मक प्रदक्षिणा वाटेल अशी ही अभिवादन यात्रा काढण्यात आली होती अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने राजीव बसर्गेकर आणि मोहनराव गुजराथी यांनी पत्रकाद्वारे दिली.
. प्रबोधिनीचे आजी-माजी विद्यार्थी, कार्यकर्ते, हितचिंतक, पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने या अभिवादन यात्रेमध्ये सहभागी झाले . अप्पा पेंडसे यांच्या छाया चित्राचे फलक हाती धरण्यात आले होते .
एक किलोमीटर लांब असलेल्या या यात्रेत भारतीय गणवेश परिधान करून विविध पथकांसह ५ हजार नागरिक ,माजी विद्यार्थी ,कार्यकर्ते सहभागी झाले
ज्ञान प्रबोधिनी चे संचालक डॉ गिरीश बापट ,यशवंतराव लेले ,कार्यवाह सुभाष देशपांडे ,विनय हर्डीकर ,डॉ सचिन गांधी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले .
डॉ धनंजय केळकर , ग्राहक पेठे चे सुर्यकांत पाठक ,अशोक येनपुरे ,प्रमोद कोंढरे ,आनंद सराफ ,विजय रणधीर ,अशोक गोडसे ,महेश सूर्यवंशी ,राष्ट्रीय मुस्लिम मंच चे लतीफ मगदूम ,राजेश येनपुरे ,एड शिरीष मोहिते अनेक संस्था -मंडळांनी स्वागत केले .
अभिवादन यात्रेचा मार्ग न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड-ग्राहक पेठ -अभिनव कला चौक-शनिपार चौक-मंडई-बेलबाग चौक-बुधवार चौक-अप्पा बळवंत चौक- वैभव चौक (बाजीराव रस्ता-लक्ष्मी रस्ता क्रॉस)-उंबर्या गणपती चौक-रमणबाग चौक-केसरी वाडा-केळकर रस्ता-जोंधळे चौक-ज्ञान प्रबोधिनी- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड असा होता
सर्व धर्मीय मान्यवरांनी यात्रेचे ठीक ठिकाणी स्वागत केले .
या अभिवादन उपक्रमांच्या आयोजनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची संयोजन समिती स्थापन करण्यात आली होती यामध्ये ज्येष्ठ उद्योजक रामकुमार राठी, रवि पंडित, मराठा चेबरचे अनंत सरदेशमुख, माजी खासदार प्रदीप रावत, डॉ. अशोक कुकडे, राम कोल्हटकर, डॉ.सतीश देसाई, सुधीर गाडगीळ, ग्राहक पंचायतिचे सुर्यकांत पाठक, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, प्रा.राम डिंबळे, विनय हर्डिकर, मोहन गुजराथी व ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे यांचा समावेश होता


