पुणे- शहरातील विविध जिममधील व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगल्याप्रकारे व्हावी याकरिता स्टेरॉईड इंजेक्शन मेफेटर्मिन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर 14 स्टेरॉईड इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी माहिती दिली की, या प्रकरणात दीपक बाबुराव वाडेकर( वय -32 ,राहणार- खडकी, पुणे) व साजन अण्णा जाधव (वय- 25 ,राहणार- औंध,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपी विरोधात पोलीस हवालदार तेजस रमेश चोपडे यांनी तक्रार दाखल केलेली आहे. संबंधित आरोपी हे नतावाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारमध्ये बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर आरोपींकडे औषधे बिल नसताना औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहिती असताना देखील, संबंधित औषधे अवैधरीत्या प्राप्त करून गैरवापर करण्याचे उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या कब्जात बाळगल्याचे दिसून आले आहे.
संबंधित इंजेक्शन त्यांनी कोठून आणली आहेत, ते कोणाला विक्री करणार होते ,त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमध्ये पडून तरुणाचा मृत्यूकोंढवा परिसरातील येवलेवाडी याठिकाणी पिरॅमिड कन्स्ट्रक्शनच्या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदर ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निष्काळजीपणाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे, ठेकेदार याच्या हाताखाली काम करणारा त्यांचा मुलगा सनी डक्टर सोनी ( वय 19) हा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या मोकळ्या डक्टमधून खाली पडून जागीच मयत झाला आहे. सदर मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याचे वडील डाक्टर दिनेश कुमार रामसमुज द्विवेदी (वय 37 ,राहणार- येवलेवाडी ,पुणे )यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपी विरोधात केशरीनारायण सोनी (वय 21 ,राहणार -बलरामपुर ,उत्तरप्रदेश) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.