पुणे – कोणताही सण, विशेष दिवस असला की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स जाहीर केल्या जातात, चोखंदळ पुणेकर त्यातल्या चांगल्या ऑफर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद देतातच शिवाय शोरूम चालकानांही सुखद धक्का देउन जातात, याचा प्रत्यय नुकताच ‘हॅशटॅग’ मेन्स वेअरच्या प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफरच्या निमित्ताने आला.
‘हॅशटॅग’ मेन्स वेअरच्या पुणे शहरासह राज्यात विविध ठिकाणी शाखा आहेत, ग्राहकहिताचा विचार करून ‘हॅशटॅग’च्या वतीने नेहमीच खरेदीवर विविध सवलती, ऑफर्स देण्यात येतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर ठेवण्यात आली होती, ती म्हणजे तुमचे वय ५० वर्षापेक्षा जितके अधिक असेल तेवढा डिस्काउंट तुम्हाला खरेदीवर मिळेल. या ऑफरला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ज्येष्ठ पुणेकरांनी मनमुराद खरेदीचा आनंद लुटला.
याबद्दल बोलताना ‘हॅशटॅग’ मेन्स वेअरच्या निवेदिता नहार म्हणाल्या की, आम्ही दरवर्षी लहान मुले, तरूणाईसाठी विविध ऑफर देत असतो, यंदा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कीम ठेवली होती, त्याला शहर आणि जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद दिला, चोखंदळ पुणेकर नेहमीच उत्साही असतात, त्याचा प्रत्यय आम्हाला पुन्हा एकदा आला. सायंकाळपर्यंत ज्येष्ठ नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला यामध्ये ९१ वर्षांच्या आजोबांचाही समावेश होता. त्यांना आम्ही खरेदीवर ९१ टक्के डिस्काउंट दिला. त्यानंतर लक्ष्मी रोड शाखेतून मला फोन आला १०५ वर्षांच्या आजी खरेदीसाठी आल्या आहेत, तेंव्हा ही ऑफर आमच्या अंगाशी येतेय की काय? असे वाटले, आम्ही त्यांना गारमेंट आणि त्यावर ५ टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या आजीबाई म्हणाल्या तुम्ही आमच्यासाठी योजना ठेवली याबद्दल तुमचे आभार मानतो आणि त्या आजीबाईंनी विनम्रतेने ती ५ टक्के रक्कम नाकरली व आम्हाला सुखद धक्का दिला. शहर व जिल्ह्यातील नागरीकांसाठी यापुढेही अशाच काही चांगल्या ऑफर्स घेउन यायला आम्हाला आवडेल आणि पुणेकर त्यालाही असाच भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वास आहे.