(समीक्षण )
(रसिकांसाठी येथे या सिनेमातील व्हिडीओ गाणे देत आहोत … पहा .. ऐका)
कलाकार -स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, मुरली शर्मा, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, प्रशांत दामले, ऊर्मिला कानेटकर-कोठारे, पुष्कर श्रोत्री, विवेक लागू, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर आणि जयवंत वाडकर
निर्माता – दिग्दर्शक उमेश घाडगे
दर्जा – ४/५
जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा,
विसरु कालच्या उद्याच्या चिंता ही जरा..
या गाण्याच्या ओळीतच ‘वेलकम जिंदगी ‘ या सिनेमाचा सारा अर्थ समावला आहे हा करमणुकीसाठी नाही ,पण प्रत्येकाने किमान एकदा तरी सिनेमागृहात जावून बघण्यासाठीचा सिनेमा मात्र निश्चित आहे . राजेश खन्नाच्या ‘आनंद ‘ ची अनुभूती यातील स्वप्नील जोशीने साकारलेला ‘आनंद ‘ देतो असे म्हणणे कोणाला फारच अतिशयोक्ती वाटली तरी राजेश खांना च्या ‘आनंद’ ची आठवण मात्र तो हमखास च देतोच देतो . नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करणारा , आगळी वेगळी कथा आणि संकल्पना मांडणारा गणेश मतकरी लिखीत आणि उमेश घाडगे दिग्दर्शित ‘वेलकम जिंदगी’ काल रिलीज झालाय.व्यसनमुक्ती केंद्रांप्रमाणे अगदी आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशा निर्णयाप्रत पोहोचलेल्या , नैराश्य आलेल्या व्यक्तींसाठी आगळे वेगळे प्रबोधन केंद्र उघडून त्यांना जगण्याची उभारी देण्यासाठी अफलातून संकल्पना या चित्रपटातून मांडली आहे. त्यामुळे मध्यंतरापर्यंत थोडा प्रबोधनकारी सिनेमा वाटला तरी मध्यंतरानंतर मात्र त्याने वेग घेतला आहे . या सिनेमात स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आहेत या दोघांनीही अफलातून काम केले आहे . पण महेश मांजरेकर, मुरली शर्मा, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, प्रशांत दामले, ऊर्मिला कानेटकर-कोठारे, पुष्कर श्रोत्री, विवेक लागू, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर अशी लोकप्रिय कलाकारांची भलीमोठी फौज आहे. आणि फावल्या वेळेत आत्म्हत्येपासून परावृत्त करणारी संस्था ते कशी चालवीत असतात हे यात पाहायला मिळते
मीरा अत्यंत स्वच्छंदी, मनमिळावू मुलगी. तिची आई तिला आधीच सोडून गेली आहे. वडिलांनी दुसरं लग्न केलंय. त्या दोघांचं मीरावर प्रेम आहे. परंतु, मीरा वेगळी रहाते. मीराही आपल्या एका जुन्या मित्राशी ती लग्नगाठ बांधणार आहे. लग्न अवघ्या दहा दिवसांवर आलंय. परंतु, काही कारणाने तिचा प्रियकर या लग्नाला नकार देतो. मीरा आतून हालते. एकाकी होते आणि आत्महत्येचा निर्णय घेते. झोपेच्या गोळ्या विकत आणून ती त्या घेणार तोच घरात आनंद अवतरतो.
आनंद प्रभू हा आत्महत्या करण्याची इच्छा असलेल्यांना आपल्या हॅपी एडिंग सोसायटी या संस्थेद्वारे आत्महत्येचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देतो. पण तो स्वत: मात्र आयुष्य भरभरून जगण्यामध्ये विश्वास ठेवणारा आहे आणि असा हा आनंद प्रभू आयुष्यातल्या सगळ्या वाटा बंद झाल्याने वैफल्याने ग्रस्त असलेल्या मीराच्या आयुष्यात पोहोचतो आणि तिचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन च बदलवून टाकतो. वरकरणी आत्महत्या करण्याचे प्रशिक्षण देण्याविषयी चित्रपट वाटतं असला, तरी यातल्या विनोदी बाजाने जीवनाविषयी ओढ निर्माण करण्याचा या चित्रपटाचा उद्देश आहे.अर्थात चित्रपटाचे नाव ‘वेलकम जिंदगी’ आहे यातच सारे काही आले युवपिधीच नाही तर वयस्कानाही आवडेल असा हा सिनेमा आहे फक्त पूर्ण सिनेमा पाहूनच यावर प्रतिक्रिया देणे कधी हि छान…।