पुणे-वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतत दाहीनीतील असिसटण्ट इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत असणारे गणपत घडशी मनपातील २५ वर्षाच्या सेवेनंतर काल निवृत्त झाले.त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा निरोप समारंभ वैकुंठ परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता,यावेळी खा.वंदना चव्हाण,कामगार नेत्या मुक्त मनोहर,भाजप सरचिटणीस व वैकुंठ परिवाराचे संदीप खर्डेकर,मनपा क्षेत्रीय आयुक्त सुनील केसरी,नगरसेवक धनंजय घाटे,विनायक हनमघर,उदय जोशी,अप्पा कुलकर्णी,राजू गिजरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व श्री गणपत घडशी ज्या असंख्य पुणेकरांच्या दुखाचे साक्षीदार झाले असे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणेकरांच्या वतीने ख.वंदना चव्हाण व संदीप खर्डेकर यांच्या हस्ते मानपत्र,भगवान शंकराची मूर्ती,शाल व श्रीफळ देऊन श्री घडशी यांना निरोप देण्यात आला.यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या”वैकुंठ स्मशानभूमिसारख्या ठिकाणी काम करणारे गणपत घड्शी सारखे कर्मचारी हे मनपा चे भूषण असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे,विपरीत परिस्थितीत संयम ढळू न देता कार्यरत राहणे हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य असून त्याबद्दल आम्ही पुणेकरांच्या वतीने गणपत घडशी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत.”त्यांनी येथे केलेली सेवा माझ्यासह सर्व पुणेकर नेहमीच स्मरणात ठेवतील.असे ही त्या म्हणाल्या.
श्री संदीप खर्डेकर म्हणाले “गणपत घडशी आणी माझा घाट तीस वर्षांचा स्नेह असून वैकुठा सारख्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने आदर्श निर्माण केला आहे,रात्री अपरात्री येणाऱ्या मृत् देहासोबात् च्या शेकडो नातेवाईकांचे ते आधार झाले,इतरांचे सांत्वन करून वेळप्रसंगी आर्थिक मदतीपासून चहा पाजण्या पर्यंतचे सर्व कार्य निस्पृह वृत्तीने करणारे गणपत घडशी खऱ्या अर्थाने पुणेकरांच्या मानपत्रास पात्र आहेत.त्यांनी या ठिकाणी सेवा करताना सकाळी १० ते ५ काम करून जायचे एवढेच उद्दिष्ट्य ठेवले नाही तर हे काम एक व्रत म्हणून स्वीकारले आणि २५ वर्षानंतर निवृत्त होताना मोठ्या संख्येने जमलेले स्नेहीजन त्यांच्या कार्याची पावती देत आहेत.श्री घडशी निवृत्त झाले असले तरी ते वैकुंठ परिवाराचा अविभाज्य अंग राहतील व येथील सर्वच कार्यक्रमात त्यांचा सहभाग आवश्यक असेल असे ही खर्डेकर म्हणाले.
वैकुंठ सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा निवृत्ती नंतर सत्कार व निरोप समारंभ होत आहे ही बाब आनंददायी असून वैकुंठ असेल,कचरा व्यवस्थापन विभाग असेल अश्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांप्रती मनपा प्रशासन व नागरिकांनी ही अधिक संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कामगार नेत्या मुक्त मनोहर यांनी केले.समुद्र टाळला जाताना ही आपण मास्क वापरतो पण गटारीतील विषारी वायूत उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण मास्क देऊ शकत नाही हे दुर्दैव असल्याचे ही त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री केसरी,श्री धनंजय जाधव व उदय जोशी यांनी ही मनोगत व्यक्त केले.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले,मोघे गुरुजींनी संयोजन व स्वागत केले तर एकनाथ मांडवकर यांनी सूत्र संचालन केले.

