Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चा ‘गंगोत्री वार्षिक स्नेहमेळावा संपन्न – ‘तरी असेल गीत हे’ ने दिला शांताबाईं शेळके यांच्या रस संपन्न गीतांना उजाळा !

Date:

unnamed
पुणे :
तरी असेल गीत हे ’ या कार्यक्रमात कवियत्री  शांताबाईं शेळके यांच्या   रस संपन्न गीतांना ,कवितांना उजाळा देण्यात आला !   डॉ अरुणा ढेरे यांचे ओघवते निवेदन आणि अनुराधा मराठे ,अपर्णा केळकर यांच्या गायनातून दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सायंकाळी शांताबाई शेळके यांचे संवेदनशील मन शब्दा- शब्दातून रसिकांच्या भेटीस आले !
निमित्त होते ,‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चा ‘गंगोत्री वार्षिक स्नेहमेळाव्याचे !
‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’  संस्थेच्या  वार्षिक स्नेहमेळाव्यामध्ये ‘शब्द सुरांची मैफल’मध्ये कवयित्री शांता शेळके यांच्या कविता आणि गीतांवर आधारित कार्यक्रम ‘तरी असेल गीत हे’ आयोजित करण्यात आला  होता . कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि निवेदन डॉ. अरुणा ढेरे यांचे होते . कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे आणि अपर्णा केळकर यांनी  गायन केले
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता  हर्षल हॉल, कासट पेट्रोल पंपाशेजारी, करिष्मा चौक, कर्वे रोड, पुणे येथे शनिवार, दिनांक 7 नोव्हेंबर 2015 रोजी सायंकाळी 6.00 ते 7.30 वाजता आयोजित करण्यात आला होता.
‘कवयित्री म्हणून ,गीतकार म्हणून शांताबाई संवेदनशील होत्या ,रस संपन्न शब्द ,पाठांतर ,भारतीय परंपरेचे चिंतन हे त्यांचे वैशिष्ट्य होते . त्यांचे जीवन साधेपणाने बहरलेले होते . चित्रदर्शी वर्णन ,सहज सुंदर ललित लेखन आणि उत्तम संस्कृत ज्ञानातून त्या कवितेची एकेक ओळ जिवंत करतात ‘ अशा शब्दात डॉ अरुणा ढेरे यांनी शांताबाई शेळके यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि काव्याचे वर्णन केले
यावेळी ‘मागे उभा मंगेश ‘, ‘ हे शामसुंदर राजसा ‘,,’जय शारदे वागीश्वरी ‘,’गणराज रंगी नाचतो ‘ अशी एकाहून एक बहारदार गीते सादर करण्यात आली
  ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चे संचालक  मकरंद केळकर ,गणेश जाधव, राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले
यावेळी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाविषयक मार्गदर्शना साठी दालन उभारण्यात आले होते . नागरिकांना राजेंद्र ठाकूरदेसाई,रवि बापट ,नरेंद्र गोहाड   या तज्ञांनी मार्गदर्शन केले . नागरिकांनी मोठी गर्दी केली होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...