ज्ञानबा तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी) – नैसर्गीक आकाराच्या लाकडाला काहीचा कलात्मक आकार देऊन साकारलेला गणपती, चिमणी, दारूडा, लांब केसाची सौदर्यवती, बदक, म्हातारे गृहस्त आदी आकर्षक काष्टशिल्पाच्या प्रदर्शाने 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रथदालनात आकार्षनाचा विषय ठरली.
सौदर्य हे पाहणाऱ्यांच्या डोळ्यात असते फक्त ते हेरण्याची गरज असते, याचा प्रत्यय परभणी जिल्ह्यातील झरी या एका गावातुन आलेले काष्टशिल्पकार नामदेव पंडित यांच्या कलाकृती पहाताना आला. महावितरणमध्ये नोकरी केल्यानंतर निवृत्त झालेले पंडित हे आपल्या कलेविषयी जागृक असल्याचे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवते, त्यांच्या ग्रामिण भागातील साधेपणा व कलेविषयीची आत्मियता प्रकर्षाणे जाणवते. आपल्या कलाकृतींच्या प्रवासाविषयी पंडित सांगतात, मी खेडेगावातील आहे. लहानपणी आई स्वयंपाक करताना मी तिच्या शेजारी बसायचो. तेव्हा ती मला कोळश्यांच्या आकारामध्ये कोणता प्राणी दिसतो सांग? अस म्हणायची त्यातून कोणत्याही घटकात कोणता नैसर्गीक आकार दिसतोय हे पाहण्याची सवय लागली. त्यातूनच लहान वयापासून मी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय कलाकृती करायला लागलो. अगदी या कलेला काष्टशिल्प म्हणतात हे ही मला त्यावेळी माहित नव्हत. आज राज्याच्या विविध भागात जवळपास पन्नसहुन अधिक ठिकाणी या कलाकृतींचे प्रदर्शन आम्ही भरवले आहे. मात्र, पुणे-पिंपरी परिसरात हे प्रदर्शन भरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. येथील रसिकांचा प्रतिसाद मराठवाडा, विदर्भातील रसिकांपेक्षा निश्चित वेगळा आहे.
यावेळी पंडित यांना त्यांच्या कलाकृती विकत देण्याची अनेकांनी मागणी केली. पण त्यांनी कलाकृती विकण्यास विनम्रपणे नकार दिला. याचे कारण विचारले असता ते म्हणतात या केवळ माझ्या कलाकृती नाही तर माझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत.