‘काव्य सप्ताह-2015’ चे उद्घाटन संपन्न
पुणे :
‘कविताप्रेमींचा : वार्षिक आनंदोत्सव’ अशी ख्याती असलेला ‘काव्य सप्ताह-2015’ चे उद्घाटन ‘रसिक मित्रमंडळा’चे अध्यक्ष डॉ. सुरेशचंद्र सुरतवाला यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले.
ज्येष्ठ कवी रमेश वैद्य आयोजित या काव्य सप्ताहाचे हे 16 वे वर्ष आहे. ‘भारत स्काऊट अॅण्ड गाईडचे सभागृह’, उद्यान प्रसाद कार्यालयसमोर, सदाशिव पेठ, येथे हा उद्घाटन कार्यक्रम झाला. बहिणाबाईंच्या काव्यावरील ‘बहिणाई माझी माय’ हा कार्यक्रम अनुया कुलकर्णी, मोहिनी कारंडे आणि संजीव गोखले यांनी सादर केला.
कार्यक्रमाचे संहिता लेखन अनुया कुलकर्णी यांनी केले होते. ज्येष्ठ कॉपीरायटर राजेंद्र देशपांडे आणि दीपक बिडकर यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला.
रमेश गोविद वैद्य यांनी सप्ताहाचा 15 वर्षांचा आढावा घेतला. कवियीत्री मीना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
‘काव्य सप्ताह-2015’ दिनांक 31 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत भारत स्काऊट अॅण्ड गाईडचे सभागृह, येथे सुरु आहे.