कामगारांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Date:

पुणे:- औद्योगिक वसाहतींचे आरोग्य चांगले रहावे यासाठी, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या माध्यमातून उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश, अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी संबधित यंत्रणेला दिले.

जिल्हा उद्योग मित्र समितीची मासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी.डेकाटे, पिंपरी चिंचवड लघु उद्योग विकास समितीचे अध्यक्ष गोविंद पानसरे, बारामती चेबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दत्ता कुंभार यावेळी उपस्थित होते.

औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा चांगला असावा आणि त्यांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केले. यासोबतच हिंजवडी औद्योगिक परिसरातील घनकऱ्याची विल्हेवाट, औद्योगिक परिसरात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती, ई.एस.आय.रुग्णालयाची बांधणी, पीएमपीएमल बसेस पार्किंगसाठी औद्योगिक क्षेत्रात जागा उपलब्ध करुन देणे, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी अंतर्गत रस्त्यावर बस सेवा पुरविणे, चाकण औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती, बारामती औद्योगिक क्षेत्रातील इंटरनेट सेवेमध्ये सुधारणा करणे, उद्योगांना अखंडीत विद्युत पुरवठा करणे इत्यादी विषयांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. औद्योगिक विकासासाठी, संबधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून काम करावे तसेच यासंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी त्वरित सोडविण्याची सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

बैठकीला महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी  व विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...