कलाप्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे :
‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट (तएऊअ) आणि‘स्कूल ऑफ आर्ट’ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील ‘विंटर शो’ कलाप्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले होते. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी आणि महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम यांनी उद्घाटन केले.
‘विंटर शो’ नावाने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची चित्रे मांडण्यात आली होती. विविध राज्यांतून 600 जणांनी स्पर्धेत भाग घेतला. त्यातून 150 चित्रे निवडण्यात आली.
पारितोषिक वितरण 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती ऋषी आचार्य (‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(तएऊअ) महाविद्यालयाचे प्राचार्य ), प्रा. भारत लोंढे यांनी दिली.