पुणे, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तीव‘ स्पर्धा आहे, त्यामुळे संवाद साधायलाही लोकांना वेळ नाही. सकारात्मक दृष्टीने कलेकडे पाहण्यासाठी संस्कार आणि परंपरेतून आपला कलेविषयी दृष्टिकोन निर्माण झालेला असतो. हा पूर्वग‘हदूषित दृष्टिकोन दूर ठेवून आपल्या कलात्मकतेच्या कक्षा रुंदावण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
राजहंस प्रकाशनतर्फे डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना सोनाली कुलकर्णी बोलत होत्या. प्रकाशक सदानंद बोरसे उपस्थित होते. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ कवियत्री डॉ. अरुणा ढेरे, गायिका सावनी शेंडे, प्रकाशक दिलीप माजगावकर यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेले होते.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. त्यामध्ये कळत नकळतपणे प्रत्येकाला सहभागी व्हावेच लागते. कलेच्या क्षेत्रातही स्पर्धा असावी पण ती नकारात्मक नसावी, संगीत, गायन, वादन या कला आपण लहानपणापासून ऐकत असतो, त्याचा संस्कार आपल्या मनावर होतो. त्यामुळे आपल्याला ठराविक कलाकार आपलेसे वाटतात आणि इतर कलांविषयी दुरावा निर्माण होतो. हा दुरावा कमी केला तर आपण कलेचा अधिक चांगल्या पध्दतीने आवद घेऊ शकतो.’
डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले, ‘केवळ चांगले दिसण्याने किंवा सादरीकरणाने कलाकार मोठा होत नाही. त्यामध्ये त्याचा आत्मा आणि परिश्रम उतरावे लागतात. पाश्चात्य संगीताकडे परकेपणाने न पाहता आपल्या कलेचा आवाकार वाढविला पाहिजे.’
या प्रसंगी डॉ. जावडेकर यांनी पॉप, जॅझ, भावसंगीत, नाट्यसंगीतावर आधारीत कार्यक‘म सादर केला. सदानंद बोरसे यांनी प्रास्ताविक केले.