कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये सी.एस. आर. सर्टिफिकेट अभ्यासक्रम
पुणे :
कर्वे समाजसेवा संस्थेच्या सी. एस. आर. विभागातर्फे सर्टिफिकेट प्रोग्राम इन सी.एस.आर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर यांनी ही माहिती दिली.
कंपन्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत नफ्याच्या दोन टक्के भाग सामाजिक उपक्रमासाठी देण्यास सुरुवात झाली आहे. नव्या कायद्यानुसार अंमलबजावणी होताना सी. एस. आर. कार्यक्रमांचे देखरेख, मूल्याकंन, अहवाल याविषयी काम करू शकणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याची गरज आहे.
‘मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स’द्वारा स्थगित संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्पोरेट अर्फअर्स’च्या संयुक्त विद्यमाने कर्वे समाजसेवा संस्था हा सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरू करीत आहे.
9 महिन्यांचा हा अभ्याक्रम ऑनलाईन स्वरूपाचा आहे. क्षेत्रकार्य, प्रशिक्षण, मार्गदर्शन, संवाद याचाही समावेश आहे.
नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर 2015 ही अंतिम तारीख असून, 020-65007565 किंवा csrcellkinss@gmail.com संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.