पुणे-
ऑर्किड शाळेने आपला ११ व वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एक अत्यंत मोठा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित
केला होता. त्या निमीत्ताने. सर्व पालक , विद्यार्थी व शिक्षक आणि शाळेशी संबंधित अनेक सहकारी हे एकत्र आले
होते. १३ ओगस्ट ला संध्याकाळी शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम आयोजित केला होता.
हा कार्यक्रमा साठी भारताचे प्रसिद्ध महान असे सांस्कृतिक संगीतज्ञ रघु दीक्षित ह्यांना निमंत्रित केले गेले होते.
ते भारताचे एक रॉक संगीत गायक आहेत. कन्नड सिनेमाच्या जगात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ते उत्तम
गायक , निर्माते तसेच गाणे लिहून त्याला संगीताचा साज चढवणारे संगीततज्ञ आहेत. त्यांचे रॉक संगीत असले
तरी त्याचा मुळाशी भारतीय परंपरा तसेच भरतीय संस्कृती व संगीताचाच भरभक्कम आधार दिसतो त्याचे
सादरीकरण करताना ते वेष्विक संगीतातून करतात.
रघु दीक्षित ह्याचा कार्यक्रम अत्यंत बहारदार झाला. त्यांनी रंग मंच दणाणून सोडला. आपल्या गाण्यावर सर्वाना
नाचायला भाग पडले. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन नवीन गाण्याची मेजवानी दिली. तसेच त्यांच्या शालेय
जीवनाशी संबधित गाणी त्यांनी ऐकवली . सर्व पेक्षक त्यांच्या गाण्यात रंगले होते. रॉक संगीत असल्यामुळे सर्वजण
उभे राहून आनंदात , उत्साहात , गाण्याची मजा लुटत होते. एक अविस्मरणीय असा अनुभव हा कार्यक्रम देऊन गेला.
लोकसांगितला नव्या संगीताचा साज त्यांनी चढवून आपल्या स्पष्ट , खणखणीत आवाजातून त्यांनी गाऊन प्रेक्षकांना
मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांना बरोबर घेऊन त्यांना सतत नाचवत ठेऊन ते गाणे गात होते. त्यांच्या आवाजात एक
वेगळीच जादू आहे. एका विशिष्ट प्रकारच्या संगीतात न रमता आधुनिक संगीताचा आविष्कार त्यांच्या गाण्यातून
, गाण्याच्या चालीतून प्रकट होत होता.
आमच्या मुलांचे भाग्य असे की रघु दीक्षित ह्यांच्या बरोबर मुलांना संवाढ साधता आला. त्यांनी आपली संगीतातील
वाटचाल कशी होत गेली हे सांगितले. त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांची त्यांनी ओळख न विसरता करून
दिली.