‘ऑनलाईन अॅनिमेशन ऑलिंपियाड’ स्पर्धेचे आयोजन दिनांक 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत नावनोंदणीचे आवाहन
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘ग्राफिक स्लेट डॉट कॉम’ या संस्थांच्या वतीने भारतातील पहिल्या ‘ऑनलाईन अॅनिमेशन ऑलिंपियाड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑलिंपियाडमध्ये भाग घेण्यासाठी 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(तएऊअ) महाविद्यालयाचे प्राचार्य रिषी आचार्य यांनी दिली.
‘ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन्स, अॅनिमेशन आणि एडिटींग व व्हिज्युअल इफेक्ट्स’ या विषयावर आधारित या ऑलिंपियाडमध्ये ऑनलाईन एमसीक्यु परिक्षा व पोर्टफोलिओ अशा दोन फेर्या असतील. ऑलिंपियाडमधील विजेत्याला ऑलिंपियाडचे प्रायोजक हाय टेक यांच्या वतीने रूपये 25 लाखांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष व्यवहारात मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि अॅनिमेशन जगात कलात्मकता वाढविण्यासाठी ही ऑलिंपियाड स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. ऑलिंपियाड स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला ‘अॅपल मॅक बुक एअर’, उपविजेत्याला एच पी कंपनीचा लॅपटॉप तर द्वितीय उपविजेत्याला सोनी कंपनीचे प्ले स्टेशन गेम झोन अशी पारितोषिके दिली जातील.
अधिक माहितीसाठी http:// animationolympiad.org, या संकेतस्थळावर किंवा दुरध्वनी क्रमांकावर 888 88 08 108 संपर्क साधावा.