पुणे कॅम्प मधील सेंटर स्ट्रीटवरील राहणारे उर्मिलाबेन कीर्तीकुमार शहा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्या ७३ वर्षांच्या होत्या . त्यांच्या मागे २ मुले , २ मुली , सुना, जावई , नातवंडे असा परिवार आहे .
भारतीय जनता युवा मोर्चा पुणे कॅम्प विभागाचे अध्यक्ष सागर शहा यांच्या त्या मातोश्री होत्या .तसेच , पुणे कॅम्प मधील सेंटर स्ट्रीटवरील केशवलाल माणिकलाल या कपड्याचे फर्मचे व्यापारी अमर शहा यांच्या त्या मातोश्री होत्या . त्यांच्यावर शंकरशेठ रोडवरील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . अंत्यसंस्कार समयी पुणे कॅम्प भागातील व्यापारी बांधव , सर्व सामाजिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते .