कैसी तर्तीब से कागज पे गिरे है आसू
एक भूली हुई तस्वीर उभर आई है
उसकी खुशबू मेरी गजलोमे सिमट आई है
दाग का दाग है रुस्वाई की रुस्वाई है
दिल्लीच्या दर्दभरी उर्दू गजलांचा पुणेकरांवर प्रसिध्द उर्दू शायर इकबाल अशहर यांनी वर्षाव केला , व पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या उर्दू कवी संमेलन ऑल इंडिया मुशायरा या कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले . लखनौचे जेष्ठ शायर जावेद मलिकजादा . यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मुशायऱ्यात देशातील अनेक नामवंत उर्दू कवींनी भाग घेतला . जेष्ठ संसद सदस्य श्री. डी. पी. त्रिपाठी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . उर्दू हि शंभर टक्के भारतीय भाषा असून या देशातील गंगो – जमनी संस्कृतीचे उर्दू प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले . गालिब , फैज , जिगर व फिराक सारख्या उर्दू शायारानी आपल्या गजल व कवितांच्या माध्यमातून जगाला मानवतेचा , प्रेमाचा आणि एकमेकांच्या सुख दुखांना समजून घेण्याचा संदेश दिला आहे , आणि तो आजही महत्वाचा आहे .
पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे , स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम , आमदार जयदेव गायकवाड , नगरसेवक प्रशांत जगताप ,नगरसेविका नंदा नारायण लोणकर , शाहीर सुरेश वैराळकर , श्रीमती शशिकला शिरगोपीकर , अड. म. वि. अकोलकर , इकबाल शेख , माजी नगरसेवक श्रीकांत पाटील , भारत कांबळे , आदी मान्यवर आणि गजलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या मुशायरामध्ये जावेद मलिक जादा , इकबल अशहर , शकील आझमी , कुंवर जावेद , मोइन शादाब , अतुल अजनबी , मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त खालिद कैसर , सुंदर मालेगावी , अथहर शकील , हमीद भूसावली , कोल्हापूरचे विभागीय न्यायदांडाधिकारी मोनिका सिंग , पुण्याचे उध्वव महाजन बिस्मिल या कवींनी या मुशायऱ्यामध्ये भाग घेतला .
प्रेमाच्या पलीकडे दैनदिन प्रश्नांनी ग्रासलेल्या माणसाचे सुंदर विवेचन करीत जावेद मलिकजादा यांच्या या शेरावर हि यादगार मैफल संपली .
उठाओ कॅमेरा , तस्वीर खैच लो इनकी
उदास लोग कहां रोज मुस्कराते है
या कार्यक्रमाचे सयोजन उस्मान हिरोली , इशरत अली , फहिम शेख आदींनी केले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले .

