उच्चभ्रू महिला वकिलाने दारू पिऊन केले अपघात – २ ठार – भाऊ ‘मॅगी’ वर बंदी येते , दारूवर का नाही ?
मुंबई- वरिष्ठ कार्पोरेट लॉयर जान्हवी गडकर हिने दारूच्या नशेत फूल टू तर्रर्र होऊन विरुद्ध दिशेने भरधाव व बेजबाबदारपणे ऑडी कार चालवून समोरून येणार्या टॅक्सीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टॅक्सीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले.दारूची नाश कित्येक आयुष्याची दुर्दश अशी वारंवार परिस्थिती दिसत असताना आणि सरकार हि दारुबाबत करीत असताना ‘मॅगी’ वर बंदी आणणारे सरकार दारू वर का बंदी आणीत नाही असा विचारला जावू लागला आहे दारू पिवून अनेकांच्या हातून अपघात-अपराध होतात , त्यापैकी उच्चभ्रू वर्गातील व्यक्तींकडून झालेल्या चर्चा रंगते पण दारूवर बंदी मात्र आणण्याचा साधा प्रस्ताव हि येत नाही हे आश्चर्य आहे .
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील ‘मरीन प्लाझा’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये जान्हवीने आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी केली. या पार्टीत तिने भरपूर दारू ढोसली. त्यावेळी तिने 6 पेग व्हिस्की रिचवली. घटनेच्या वेळी जान्हवी दारूच्या पूर्ण नशेत होती. अपघातानंतर नशेत असताना पोलिसांनी जान्हवीला पोलिस ठाण्यात आणले तेथेच ती रात्रभर झोपली. त्यामुळे अपघातानंतर तब्बल सात तासांनी म्हणजेच मंगळवारी सकाळी 9 वाजता तिचा जबाब नोंदवला गेला
आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी मुंबई हायकोर्टात वकील म्हणून काम करते. तसेच जान्हवी रिलायन्स कंपनीमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करते. जान्हवी चेंबूर परिसरात राहत असून रिलायन्समित्रांसोबत पार्टी केल्यानंतर जान्हवी आपल्या Audi Q3 या कारने हॉटेलातून बाहेर पडली. यावेळी तिने 6 पेग रिचवले होते. दारूच्या नशेत असलेली जान्हवी ताशी 120 च्या वेगाने ऑडी कार चालवत होती. ईस्टर्न फ्री वेवर विरुद्ध दिशेने भरधाव ऑडी कार चालवू लागली. अपघातापूर्वी जान्हवीने सुमारे 11 किलोमीटर चुकीच्या दिशेने प्रवास केला.\डॉकयार्ड रोडवर दोन मारूती स्विफ्ट कारला धडक देता-देता वाचली.
या वाहनचालकांनी तिचा पाठलाग केला; मात्र भरधाव वेगात असल्याने तिला गाठता आले नाही.
जान्हवीच्या कारने एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. टॅक्सी चालक सय्यद हुसेन पांजरपोळ टनेलपासून सबुनवाला कुटुंबियांना घेऊन चालले होते.जेव्हा अपघात झाला तेव्हा पाठीमागून पाठलाग करणारी मारूती स्विफ्ट गाडी तेथे हजर झाली, जे लोक जान्हवी पाठलाग करीत होते.ऑडी आणि ओम्नी टॅक्सीची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ऑडी कारचे टायर फाटले, इंजिनचा काही भाग तुटला. हा अपघात इतका भीषण असतानाही ऑडीतील जान्हवीला खरचटलेदेखील नाही. ऑडी टॅक्सीला धडकताच कारमधील अपघातविरोधी एअर बलून फुगले आणि जान्हवी बचावली मात्र आत अडकून राहिली. लोकांनी तिला बाहेर काढले. त्यानंतर जान्हवीला चेंबूरमधील आरसीएफ पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
नशेत चुर्रर झालेली जान्हवी पोलिस स्टेशनमधील महिला सेलमध्ये झोपी गेली.जान्हवी जेव्हा उठली तेव्हा तिच्या लक्षात आले की पोलिस ठाण्यात आहे. तेव्हा ती रडू लागली. तिने हॅंगओव्हरची तक्रारही केली.त्यानंतर
पोलिसांनी आरोपी जान्हवीचा जबाब नोंदवला.